-
अभिनेत्री राशी खन्ना ही सध्या चांगलीच चर्चेत आहे.
-
शाहिद कपूर आणि विजय सेतुपती यांच्याबरोबरच्या ‘फर्जी’ या वेबसीरिजमधून आपल्या भेटीला येणार आहे.
-
याबरोबरच सोशल मीडियावरचे तिचे बोल्ड लूक मधले फोटो चांगलेच व्हायरल होतात.
-
या क्षेत्रात स्वतःचं स्थान मिळवण्यासाठी राशीने प्रचंड मेहनत घेतली आहे.
-
अभिनयात नशीब आजमावण्याआधी राशीने पार्श्वगायिका म्हणूनही काम केलं आहे.
-
राशीला खरंतर आयएएस व्हायचं होतं, पण कॉलेजदरम्यान तिने कॉपीरायटिंगमध्ये थोड काम केलं आणि त्यामुळेच ती या क्षेत्राकडे खेचली गेली.
-
तमिळ आणि तेलुगू चित्रपटसृष्टित उत्कृष्ट काम करूनसुद्धा तिला हिंदीत म्हणावं तसं यश मिळालं नाही.
-
आपल्या याच स्ट्रगलबद्दल ‘बॉलिवूड बबल’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं आहे.
-
तिचं आधी वजन जास्त होतं, त्यामुळे जेव्हा ती ऑडिशनसाठी जायची तेव्हा बरेच लोक तिची ‘गॅस टँकर’ म्हणून खिल्ली उडवायचे.
-
राशी म्हणाली, “सर्वप्रथम या गोष्टी मी खूप मनाला लावून घ्यायचे, पण नंतर मी स्वतःकडे लक्ष द्यायला सुरुवात केली.”
-
पुढे ती म्हणाली, “हळूहळू मी वजन घटवण्याकडे लक्ष द्यायला आणि त्यादृष्टीने मेहनत घ्यायला शिकले.” आज राशीचं नाव उत्तम अभिनेत्री आणि मॉडेल्सच्या यादीत घेतलं जातं. राशीचं हे ट्रान्सफॉर्मेशन खूप प्रेरणादायी आहे.
-
जॉन अब्राहमच्या ‘मद्रास कॅफे’ या चित्रपटातून राशीने हिंदीत पदार्पण केलं होतं, पण या चित्रपटातून राशीला म्हणावी तशी ओळख किंवा लोकप्रियता मिळाली नाही. अजय देवगणच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘रुद्र’ या वेबसीरिजपासून लोकांनी राशीची दखल घ्यायला सुरुवात केली. (फोटो सौजन्य : राशी खन्ना / इन्स्टाग्राम)
“गॅस टँकरसारखी दिसतेस…” बॉडी शेमिंगबद्दल राशी खन्नाने शेअर केला अनुभव; अभिनेत्रीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहिलंत का?
या क्षेत्रात स्वतःचं स्थान मिळवण्यासाठी राशीने प्रचंड मेहनत घेतली आहे
Web Title: Raashi khanna speaks about her body shaming experience and her struggle in film industry avn