-
अमिताभ बच्चन आणि तब्बू स्टारर २००७ मध्ये आलेल्या ‘चीनी कम’ या चित्रपटाची बालकलाकार स्विनी खारा हिने एंगेजमेंट केली आहे.
-
स्विनीने एका इंस्टाग्राम पोस्टद्वारे ही माहिती दिली.
-
स्विनी खराने तिच्या इन्स्टाग्रामवर एंगेजमेंट सेरेमनीचे काही फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये स्विनी तिचा होणारा पती उर्विशबरोबर डान्स करताना दिसत आहे.
-
हे फोटो शेअर करत स्विनीने कॅप्शनमध्ये लिहिले की, “मी कागदाची अंगठी घेऊनही तुझ्याशी लग्न करण्यास तयार आहे.”
-
स्विनीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती आणि उर्विश खूप सुंदर दिसत आहेत.
-
उर्विशने ब्लॅक सूट घातला होता,तर स्विनी गुलाबी रंगाचे शेड्स असलेल्या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत होती.
-
दोघांनी जयपूरमध्ये एंगेजमेंट केली. त्यांच्या या फोटोंवर अविका गौरसह काही कलाकारांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
-
स्विनी व उर्विश एकमेकांना डेट करत होते आणि आता ते लग्नबंधनात अडकणार आहेत.
-
टीव्ही शो व्यतिरिक्त स्विनी खारा अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसली आहे.
-
स्वीनीने सैफ अली खान आणि विद्या बालन स्टारर ‘परिणीता’ आणि ‘चिंगारी’ या चित्रपटात काम केले होते.
-
याशिवाय स्वीनी शाहिद कपूर आणि आयशा टाकियाच्या ‘पाठशाला’ या चित्रपटाचाही भाग होती.
-
स्वीनीने ‘एमएस धोनी’ चित्रपटात धोनीची बहीण ‘जयंती’ची भूमिका साकारली होती.
-
स्विनी ‘चिनी कम’ चित्रपटातील तिच्या भूमिकेसाठी विशेष ओळखली जाते.
-
Swini Khara Engaged: बिग बींच्या ‘चिनी कम’ चित्रपटातील बालकलाकार स्विनीने उरकला साखरपुडा; फोटो शेअर करत म्हणाली…
अमिताभ बच्चन आणि तब्बू स्टारर २००७ मध्ये आलेल्या ‘चीनी कम’ या चित्रपटाची बालकलाकार स्विनी खारा हिने एंगेजमेंट केली आहे.
Web Title: Cheeni kum child actor swini khara gets engaged to boyfriend urvish desai see photos hrc