-
या अभिनेत्रीने आपल्या फ्लॉप करीअरसाठी बहिण दिव्या भारतीला ठरवले जबाबदार
-
‘ग्रैंड मस्ती’ मधून बॉलिवूडमध्ये पदापर्ण करणारी अभिनेत्री कायनात अरोडा सध्या बॉलिवूडमधून गायब आहे.
-
कायनात दिवंगत अभिनेत्री दिव्या भारतीची बहीण आहे
-
बॉलिवूडध्ये तिचं करिअर जोर धरु शकलं नाही
-
दिव्या भारतीने ९० च्या दशकात एकामागून एक ब्लॉकबस्टर हिट्स देऊन दहशत निर्माण केली होती.पण १९९३ मध्ये दिव्या भारतीचा गूढ मृत्यू झाला.
-
पण जेव्हा कायनात अरोराने चित्रपटांमध्ये पाऊल ठेवले तेव्हा तिला बहिण दिव्या भारतीच्या स्टारडमचा भार जाणवला.
-
उत्तर प्रदेशातील सहारनपूरची राहणारी कायनात अरोराने नेहमीच अभिनेत्री बनण्याचे स्वप्न पाहत असे.
-
कायनातला अभिनेत्री बनण्याची प्रेरणा दिव्या भारतीकडून मिळाली.
-
दिव्या भारतीला पाहिल्यानंतरच कायनातने चित्रपटांमध्ये येण्याचा निर्णय घेतला.
-
अभिनेत्री होण्याचे कायनात अरोराचे स्वप्न २०१३ मध्ये साकार झाले जेव्हा तिला ‘ग्रँड मस्ती’ या चित्रपटात भूमिकेची ऑफर आली.
-
या चित्रपटापूर्वी कायनातने फक्त दोन चित्रपटांमध्ये आयटम साँग केले होते.
-
कायनात अरोराने पदार्पणानंतर अनेक चित्रपटांमध्ये काम केले. बॉलीवूड व्यतिरिक्त, तिने अनेक साऊथ चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे.
-
परंतु तिला ना यश मिळाले आणि ना तिला बहिण दिव्या भारतीसारखे स्टारडम मिळू शकले नाही.
-
कायनात अरोराने एकदा दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की दिव्या भारती सारखे प्रसिद्ध नातेवाईक असणे नेहमीच फायदेशीर नसते.
-
मला दिव्या भारतीबद्दल खूप आदर आहे, पण ती माझी बहीण असणं कोणत्याही प्रकारे फायदेशीर ठरलं नाही.
-
कायनात म्हणाली होती, दिव्या भारतीची बहिण बनणे माझ्यासाठी ओझे झाले होते. लोक माझी आणि दिव्याची तुलना करु लागले होते.
-
मला वाटते की दिव्या भारती माझी बहीण नसती तर मी खूप चांगले काम केले असते. कायना अरोरा अजूनही चित्रपटांमध्ये सक्रिय आहे. पण तिला हवा तशी भुमिका मिळाली नाही.
-
ती लवकरच दीपक तिजोरीच्या ‘टिप्सी’ चित्रपटात दिसणार आहे. मात्र त्याची रिलीज डेट अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. (फोटो इन्स्टाग्राम व संग्रहित)
“ती माझी बहीण नसती तर…”; फ्लॉप करिअरसाठी अभिनेत्रीने दिव्या भारतीला ठरवलं जबाबदार
‘ग्रैंड मस्ती चित्रपटात दिसलेली अभिनेत्री कायनात अरोडा आता बॉलिवूडमधून गायब आहे. तिने आपल्या फ्लॉप करीअरसाठी दिवंगत अभिनेत्री दिव्या भारतीला जबाबदार धरले आहे
Web Title: Grand masti actress kainaat arora blame to her cousin sister divya bharti to her flop career dpj