-
मुकेश अंबानी हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. त्यांच्या लाईफस्टाईलमुळे नेहमीच ते चर्चेत असतात.
-
त्यांची पत्नी नीता अंबानी यांनी नुकतेच त्यांचे स्वतःचे नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर सुरू केले.
-
याचा उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला आणि या प्रसंगीदेखील त्यांचा राजेशाही थाट दिसून आला.
-
या व्यतिरिक्त त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टींमुळे अनेकदा सर्वांचे लक्ष त्यांच्याकडे वेधले जाते.
-
मुकेश अंबानी यांच्याकडे जगभरातील अनेक महागड्या गाड्या आहेत. या गाड्या चालविण्यासाठी त्यांच्याकडे निष्णात ड्रायव्हरही आहेत.
-
त्या ड्रायव्हरना अंबानी महिन्याला जितका पगार देतात तितका पगार एखाद्या मल्टिनॅशनल कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यालाही नसेल.
-
मिंटने दिलेल्या रिपोर्टनुसार,, मुकेश अंबानी त्यांच्या पर्सनल ड्रायव्हरला २०१७ साली दर महिन्याला २ लाख रुपये देत होते. या ड्रायव्हरचा वर्षाचा पगार तब्बल २४ लाख रुपये होता. तर २०१७ ते २०२२ दरम्यान हा पगार आणखीन वाढला आहे.
-
प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टिंग फर्म्समधून मुकेश अंबानी त्यांच्या ड्रायव्हरची नेमणूक करतात. या ड्रायव्हर्सना त्यापूर्वी अनेक आलिशान गाड्या चालवण्याचे ट्रेनिंग दिले जाते.
-
हे ट्रेनिंग त्यांनी उत्तमरीत्या पूर्ण केल्यावर त्यांची नेमणूक केली जाते. याचबरोबर त्यांचा विमाही काढला जातो.
(सर्व फोटो सौजन्य: ईशा अंबानी/इंस्टाग्राम)
मुकेश अंबानींच्या ड्रायव्हरला मिळणारा पगार मल्टिनॅशनल कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यापेक्षाही जास्त! ‘अशी’ केली जाते निवड
दर महिन्याला अंबानी त्यांच्या ड्रायव्हरच्या पगारावर मोठी रक्कम खर्च करतात.. पण या ड्रायव्हर्सना द्यावी लागणारी परीक्षाही सोपी नसते.
Web Title: Mukesh ambani spends huge amount on his drivers salary rnv