-
‘मेट गाला’ हा फॅशन इव्हेंट दरवर्षी आयोजित केला जातो.
-
या सोहळ्यात हॉलिवूडपासून बॉलिवूडपर्यंत अनेक बडे स्टार्स सहभागी होतात.
-
प्रियांका चोप्रापासून ते ईशा अंबानीपर्यंत सगळ्यांनी या कार्यक्रमात आपली उपस्थिती नोंदवली आहे.
-
मेट गाला फॅशन इव्हेंट दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित केला जातो.
-
या फॅशनचा शोमध्ये कलाकार नेहमी फॅशनवर वेगवेगळे प्रयोग करताना दिसतात.
-
सहसा या फॅशनचा शोला ‘मेट गाला’ किंवा ‘मेट बॉल’ म्हणले जाते. परंतु त्याचे अधिकृत नाव ‘कॉस्च्युम इन्स्टिट्यूट गाला’ आहे.
-
मेट गाला हा एक धर्मादाय कार्यक्रम आहे.
-
या कार्यक्रमाच्या माध्यमातून न्यूयॉर्कमधील म्युझियम ऑफ आर्ट्स कॉस्च्युम इन्स्टिट्यूटसाठी निधी गोळा केला जातो.
-
या कार्यक्रमाची सुरुवात १९४८ मध्ये फॅशन पब्लिसिस्ट एलिनॉर लॅम्बर्ट यांनी केली होती.
-
या फॅशनचा शोमध्ये सहभागी होण्यासाठी सेलिब्रिटींना मोठी रक्कम मोजावी लागते.
-
मीडिया रिपोर्ट्सनुसार, फॅशनचा शोच्या तिकीटाची किंमत सुमारे २३ लाख रुपये आहे आणि टेबलची किंमत सुमारे २ कोटी रुपये आहे.
-
या फॅशन शोमध्ये सहभागी कलाकारांचे अप्रतिम लूक, त्यांचे कपडे आणि मेक-अप सर्वांचे लक्ष वेधून घेतात.
-
मात्र, हे कलाकार एवढ्या विचित्र लूकमध्ये इथे का पोहोचतात, असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल.
-
वास्तविक, दरवर्षी या फॅशन शोची एक थीम असते
-
थीमनुसारच सर्व सेलिब्रिटींना त्याच वेशभूषेत येणे बंधनकारक असते.
-
थीममुळे कलाकार रंगीबेरंगी आणि स्टायलिश कपड्यांमध्ये या खास कार्यक्रमात हजेरी लावतात.
-
कलाकार आपल्या फॅशनबरोबर नेहमी वेगवेगळे प्रयोग करताना दिसतात.
-
या शोमध्ये सहभागी होण्यासाठी सेलेब्सच्या ड्रेसिंग सेन्सवर कोणतेही बंधन नाही.
-
यंदा मेट गाला १ मे रोजी आयोजित करण्यात आला आहे.
-
भारतीय वेळेनुसार हा कार्यक्रम २ मे रोजी आयोजित केला जाणार आहे.
-
यावर्षी मेट गाला अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्टमध्ये होणार आहे.
-
या फॅशन शोमध्ये सहभागी होणाऱ्या कलाकारांना सेल्फी घेता येत नाही.
-
या कार्यक्रमाचे लाईव्ह चित्रीकरण केले जाते.
-
भारतातही हे चित्रीकरण प्रकाशित होते.
-
यंदा मेट गाला लाइव्हस्ट्रीम व्होगद्वारे होस्ट केले जाणार आहे.
-
हे व्होगच्या सोशल मीडिया चॅनेल, यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक आणि ट्विटर दाखवण्यात येणार आहे.
-
भारतात ते २ मे रोजी पहाटे ४ वाजता पाहता येईल.
‘मेट गाला’मध्ये कलाकार नेहमी विचित्र कपडे का घालतात? घ्या जाणून
मेट गाला हा फॅशनशी संबंधित एक प्रसिद्ध कार्यक्रम आहे. या कार्यक्रमात हॉलिवूडपासून बॉलिवूडपर्यंत अनेक बडे स्टार्स सहभागी होतात.
Web Title: Why do actors celebrities wear weird clothes at the met gala fashion event dpj