-
आकाश अंबानी आणि श्लोका मेहता या दोघांनी ९ मार्च २०१९ रोजी लग्नगाठ बांधली.
-
या दोघांना पहिला मुलगा आहे, ज्याचं नाव पृथ्वी आहे.
-
तर आता श्लोका अंबानी ही दुसऱ्यांदा गरोदर आहे.
-
काही दिवसांपूर्वीच ‘नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्र’चा उदघाटन सोहळा मोठा दिमाखात पार पडला होता. त्या वेळी श्लोका अंबानीच्या बेबी बम्पने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते.
-
आता तिच्या डोहाळे जेवणाच्या सेलिब्रेशचा एक फोटो व्हायरल होत आहे.
-
श्लोका मेहता-अंबानीच्या डोहाळेजेवणाचा कार्यक्रम तिच्या मैत्रिणींनी आयोजित केला होता.
-
हा कार्यक्रम त्यांनी दणक्यात साजरा केला.
-
श्लोकाच्या या डोहाळेजेवणाच्या कार्यक्रमामध्ये श्लोकाच्या सर्व खास मैत्रिणी सहभागी झाल्या होत्या. या कार्यक्रमात श्लोकाने गुलाबी रंगाचा गाऊन परिधान केला होता आणि डोक्यावर टियारा घातला होता.
-
त्या व्हायरल फोटोवर कमेंट करत नेटकरी तो फोटो आवडल्याचं सांगत आहेत.
श्लोका अंबानीच्या डोहाळेजेवणाचं ग्रँड सेलिब्रेशन, फोटो व्हायरल
आकाश अंबानी आणि श्लोका यांना पहिला मुलगा आहे आणि आता श्लोका अंबानी दुसऱ्यांदा गरोदर आहे.
Web Title: Shloka ambani had a grand baby shower celebration with her close friends photo viral rnv