-
‘स्कॅम 1992’ आणि ‘शाहिद’ फेम हंसल मेहता यांनी दिग्दर्शित आणि निर्मिती केलेली नवीनतम नेटफ्लिक्स वेबसीरिज ‘स्कूप’चे सर्वत्र कौतुक होत आहे. या सीरिजचे जबरदस्त कथानक आणि कलाकारांची उत्कृष्ठ कामगिरी प्रेक्षकांच्या प्रशंसेस पात्र ठरत आहे.
-
अभिनेत्री ‘करिश्मा तन्ना’ या सीरिजमध्ये पत्रकार जागृती पाठकची भूमिका साकारत आहे. यामध्ये तिच्यावर दुसऱ्या सहकारी पत्रकाराच्या हत्येचा आरोप आहे. तिचे हे पात्र जिग्ना व्होरा यांच्यावर आधारित आहे, त्यांच्या ‘बिहाइंड बार्स इन भायखळा: माय डेज इन प्रिझन’ ही कथा या सीरिजची प्रेरणा आहे.
-
या सीरिजमध्ये करिश्मा तन्नासह मोहम्मद झीशान अय्युब, प्रोसेनजीत चॅटर्जी, हरमन बावेजा, देवेन भोजानी आणि तनिष्ठा चॅटर्जी इतर प्रमुख भूमिकांमध्ये आहेत.
-
इतकंच नाही, तर तेजस्विनी कोल्हापुरे सारस्वतने ‘स्कूप’मध्ये ‘रंभा मा’ची प्रमुख भूमिका साकारली आहे. आज आपण अभिनेत्री श्रद्धा कपूरची मावशी आणि ज्येष्ठ अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांची बहीण तेजस्विनी कोल्हापुरे यांच्याबद्दल जाणून घेऊया.
-
तेजस्विनी कोल्हापुरेचं लग्न पंकज सारस्वत यांच्याशी झाले आहे आणि त्यांना वेदिका नावाची मुलगी आहे. आपले बॉलीवूड कारकीर्द सुरू करण्यापूर्वी, तिने मालिका विश्वात पदार्पण केले आणि अनेक मॉडेलिंग असाइनमेंट केल्या.
-
तेजस्विनी कोल्हापुरे ही अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे आणि शक्ती कपूरची पत्नी, श्रद्धा कपूरची आई शिवांगी कोल्हापुरे यांची बहीण आहे.
-
तेजस्विनी कोल्हापुरे यांच्या आजी या लता मंगेशकर यांचे वडील पंडित दीनानाथ मंगेशकर यांच्या सावत्र बहीण होत्या आणि म्हणूनच, तेजस्विनी कोल्हापुरे दिवंगत भारतरत्न पुरस्कार विजेत्याच्या भाची आहेत.
-
तेजस्विनी कोल्हापुरेने अनुराग कश्यपच्या रिलीज न झालेल्या ‘पाच’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर 2013 च्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रीमियर झालेल्या ‘अग्ली’मध्ये ते दोघे पुन्हा एकत्र आले.
-
हंसल मेहताच्या ‘स्कूप’मध्ये, तेजस्विनी कोल्हापुरेने ‘रंभा मा’ उर्फ ’छाया गडा’ ही भूमिका केली आहे. तिला करिश्माच्या पत्रकारितेमुळे अटक करण्यात आली आहे आणि म्हणून ती करिश्माला तुरुंगात त्रास देण्याचे आदेश देते.
Photos: ‘Scoop’ मध्ये श्रद्धा कपूरच्या मावशीने साकारली महत्त्वाची भूमिका; जाणून घ्या तेजस्विनी कोल्हापुरेबद्दल
आज आपण अभिनेत्री श्रद्धा कपूरची मावशी आणि ज्येष्ठ अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांची बहीण तेजस्विनी कोल्हापुरे यांच्याबद्दल जाणून घेऊया.
Web Title: Shraddha kapoor aunt played an important role in scoop karishma tanna hansal mehta know about tejaswini kolhapure pvp