-
मनोरंजन क्षेत्रात असे अनेक स्टारकिड्स आहेत जे त्यांच्या आई-वडिलांच्या लग्नात उपस्थित होते. आम्ही तुम्हाला अशा आठ स्टारकिड्सची माहिती देणार आहोत.
-
Shahid Kapoor : शाहिद कपूरची आई नीलिमा अजीम यांनी आधी अभिनेते पंकज कूप यांच्याशी लग्न केलं होतं. शाहिदच्या जन्मानंतर तीन वषांनी नीलिमा आणि पंकज यांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर नीलिमा यांनी अभिनेते राजेश खट्टर यांच्याशी लग्न केलं. या लग्नाला शाहिद हजर होता. (Source: @shahidkapoor/twitter)
-
Sikandar Kher : अभिनेत्री किरण खेर यांनी त्यांचा मुलगा सिकंदर लहान असताना अभिनेते अनुपम खेर यांच्याशी लग्न केलं होतं. या लग्नाला सिकंदर हजर होता. (Source: @sikandarkher/instagram)
-
Sara Ali Khan – Ibrahim Ali Khan : अमृता सिंह हिला तलाक दिल्यानंतर सैफ अली खानने २०१२ मध्ये करीना कपूरशी लग्न केलं. या लग्नाला त्यांची दोन्ही मुलं सारा आली खान आणि इब्राहिम अली खान उपस्थित होते. (Source: @saraalikhan95/instagram)
-
Shakya Akhtar and Akira Akhtar : फरहान अख्तर आणि अधुना भभानी यांच्या लग्नाच्या १६ वर्षांनी दोघांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर फरहानने अभिनेत्री शिबानी दांडेकर हिच्याशी लग्न केलं. फरहान शिबानीच्या लग्नाला फरहानच्या दोन्ही मुली शाकिया आणि अकिरा हजर होत्या. (Source: @faroutakhtar/instagram)
-
Masaba Gupta : अभिनेत्री नीना गुप्ता हिने २००८ मध्ये विवेक मेहरा यांच्याशी लग्नगाठ बांधली होती. या लग्नाला नीनाची मुलगी मसाबा हजर होती. (Source: @masabagupta/instagram)
-
Agastya Pandya : हार्दिक पंड्या आणि त्याची पत्नी नतशा या दोघांनी दुसऱ्यांदा लग्न केलं तेव्हा त्यांचा मुला अगस्त्य हा लग्नाला हजर होता. (Source: @hardikpandya93/instagram)
‘हे’ आठ स्टार किड्स त्यांच्या आई-वडिलांच्या लग्नात होते उपस्थित
अनेक बॉलिवूड अभिनेत्यांनी आणि अभिनेत्रींनी दोन किंवा त्यापेक्षा अधिक लग्नं केली आहेत.
Web Title: Shahid kapoor sara ali khan to sikandar kher star kids who attended parents wedding asc