-
ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ चित्रपट आज १६ जून रोजी प्रदर्शित झाला.
-
चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
-
आदिपुरुषमध्ये श्रीरामाची भूमिका साकारणाऱ्या प्रभासला मराठी अभिनेता शरद केळकर यांनी आवाज दिला आहे.
-
बाहूबलीमध्येही प्रभासच्या पात्राला शरद केळकरांनी आपला दमदार आवाज दिला होता.
-
हिंदी चित्रपट नानीसाठीही शरद केळकर यांनीही आपला आवाज दिला आहे.
-
पण एक काळ असा होता की शरद केळकर यांना बोलण्याचा त्रास होता.
-
त्यांना नीट बोलता येत नव्हतं
-
त्यांना तोतरेपणाचा त्रास होता. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास नेहमी कमी असायचा.
-
वाक्य तर सोडाच पण एक शब्दही त्यांना नीट बोलता येत नव्हत.
-
तोतरेपणामुळे त्यांना आपला रागही व्यक्त करता येत नव्हता.
-
कारण राग व्यक्त करतानाही हे तोतर बोलायचे
-
पण नंतर केळकर यांनी आपल्या बोलण्याच्या त्रासकडे लक्ष दिले आणि त्यावर बरेच काम केले.
-
आपल्या आवाजावर मेहनत घेऊन शरद केळकर आज आवाजाचे बादशाह बनले आहेत.
-
त्यानंतर आज शरद केळकर अशा लोकांसाठी प्रेरणा बनले आहेत, ज्यांना बोलण्यात अडचण येते.
-
फोटो (लोकसत्ता, जनसत्ता)
तोतरेपणाचा त्रास, लोकांनी उडवलेली खिल्ली, आता बनलाय आवाजाचा बादशाह, जाणून घ्या शरद केळकरांचा संघर्ष
‘बाहूबली’ आणि ‘आदिपुरुष’मध्ये प्रभासला आपला दमदार आवाज देणारे शरद केळकर एकेकाली एक शब्दही नीट बोलू शकत नव्हते
Web Title: Sharad kelkar stammer issue makes him under confident now actor is the rock solid voice dpj