-
‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’चा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे.
-
‘रॉकी और रानी…’ आणि २००१ मध्ये रिलीज झालेल्या ‘कभी खुशी कभी गम’ या दोन्ही चित्रपटातील सीन्समध्ये बरेच साम्य आहे.
-
दोन्ही चित्रपटातील सारख्या सीन्सचे बरेच फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
-
‘रॉकी और रानी…’ च्या टीझरमधील भव्य सेट, शिफॉन साड्या, बर्फाळ प्रदेशातील रोमॅंटिक गाणे हे सगळं पाहून प्रेक्षकांना २००१ चा सुपरहिट चित्रपट ‘कभी खुशी कभी गम’ची आठवण झाली आहे.
-
दोन्ही चित्रपटातील अनेक सीन्स अगदी सेम टू सेम असल्याचे या व्हायरल फोटोंमधून स्पष्ट होत आहेत.
-
‘रॉकी और रानी…’ आणि ‘कभी खुशी कभी गम’मधील साम्य पाहून नेटकऱ्यांनी दिग्दर्शक करण जोहरला ट्रोल केले आहे.
-
“करणने त्याच्याच सुपरहिट चित्रपटातील काही सीन्स फक्त कॉपी पेस्ट करण्याचे काम केले आहे.” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.
-
एका युजरने “आलिया आणि करण नवीन काहीच करू शकत नाहीत”, असे म्हणत ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटावर टीका केली आहे.
-
दरम्यान, आलिया भट्ट आणि रणवीर सिंह मुख्य भूमिकेत असलेला ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपट २८ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘रॉकी और रानी…’ आणि ‘कभी खुशी कभी गम’मधील ‘हे’ सीन्स आहेत सेम टू सेम; नेटकरी म्हणाले, “करणने फक्त कॉपी पेस्ट…”
‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ आणि ‘कभी खुशी कभी गम’मधील सारखे सीन्स पाहून नेटकरी करण जोहरवर संतापले
Web Title: Similarities between director karan johar rocky aur rani kii prem kahaani and kabhi khushi kabhie gham sva 00