Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. maharashtrachi hasyajatra fame prithvik pratap was student of this famous college of mumbai sva

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रताप होता मुंबईतील ‘या’ सुप्रसिद्ध कॉलेजचा विद्यार्थी; अभिनेत्याने सांगितल्या जुन्या आठवणी

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता पृथ्वीक प्रतापने या कॉलेजमध्ये घेतले शिक्षण

June 28, 2023 17:24 IST
Follow Us
  • prithvik pratap hasya jatra
    1/12

    मराठमोळा अभिनेता पृथ्वीक प्रताप ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरांत पोहोचला.

  • 2/12

    अभिनय आणि विनोदाची उत्तम सांगड घालत पृथ्वीक प्रेक्षकांना खळखळवून हसवतो.

  • 3/12

    मराठी कलाविश्वात येण्यापूर्वी पृथ्वीकने आयुष्यात खूप संघर्ष केला आहे.

  • 4/12

    नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्याने त्याच्या महाविद्यालयीन जीवनाबद्दल खुलासा केला आहे.

  • 5/12

    पृथ्वीक प्रतापने त्याचे महाविद्यालयीन शिक्षण मुंबईच्या दादरमधील सुप्रसिद्ध कीर्ती कॉलेजमध्ये पूर्ण केले आहे.

  • 6/12

    महाविद्यालयीन जीवनातील संघर्षाबद्दल सांगताना पृथ्वीक म्हणाला, “माझ्या कॉलेजमध्ये असताना मी नाटकात काम करायचो त्यामुळे आयुष्यात खूप काही शिकलो.”

  • 7/12

    “कॉलेजला जायला सकाळी बाहेर पडायचो त्यामुळे घरून आणलेला डबा संपला की, नंतर काय खायचं असा प्रश्न निर्माण व्हायचा. तेव्हा मी कीर्ती कॉलेजकडे चहावाल्याजवळ पार्लेजी बिस्किटं खायचो.” असे पृथ्वीकने सांगितले.

  • 8/12

    पृथ्वीकबरोबर तेव्हापासून प्रशांत केणी, रोहित माने, चेतन गुरव, वनिता खरात, स्नेहन शिदम, सागर जाधव, रोनक शिंदे हे मित्र होते.

  • 9/12

    आम्ही सगळ्या मित्रांनी एकत्र संघर्ष केल्याचे पृथ्वीकने सांगितले.

  • 10/12

    “तेव्हाचे दिवस फार त्रासदायक होते. कोणाचेच पोट भरायचे नाही, तरीही आम्ही प्रत्येकजण एकमेकांना मदत करायचो. आम्ही तेव्हा एकत्र होतो आताही एकत्र आहोत” असे अभिनेता म्हणाला.

  • 11/12

    “कीर्ती कॉलेजच्या कट्ट्यावर आमच्या असंख्य आठवणी आहेत.”

  • 12/12

    दरम्यान, अलीकडे परिस्थिती तुलनेने खूप सुधारलीये म्हणून आता जेव्हा कधी भेटतो तेव्हा एकत्र हॉटेलमध्ये जात असल्याचे पृथ्वीकने सांगितले.

TOPICS
मनोरंजनEntertainmentमराठी अभिनेताMarathi Actor

Web Title: Maharashtrachi hasyajatra fame prithvik pratap was student of this famous college of mumbai sva 00

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.