-
अभिनेत्री-गायिका केतकी माटेगावकरची प्रमुख भूमिका असलेला, ओमकार फिल्म्स क्रिएशन्स निर्मिती संस्थेच्या राजाभाऊ आप्पाराव घुले यांची पहिलीच निर्मिती असलेला ‘अंकुश’ हा बिगबजेट चित्रपट ६ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
-
नुकताच या चित्रपटाचा टीजर आणि केतकीचा चित्रपटातील लूक सोशल मीडियावर लाँच करण्यात आला.
-
ओमकार फिल्म्स क्रिएशन्सच्या माध्यमातून राजाभाऊ घुले ‘अंकुश’ या चित्रपटाद्वारे चित्रपट निर्मितीमध्ये धडाकेबाज पदार्पण करत आहेत.
-
चित्रपटाची कथा नामदेव मुरकुटे यांची असून पटकथा व संवाद निशांत नाथाराम धापसे आणि नामदेव मुरकुटे यांचे आहेत, तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपटांचे लेखक सह दिग्दर्शक म्हणून काम केल्यानंतर निशांत नाथाराम धापसे या चित्रपटाद्वारे दिग्दर्शकीय पदार्पण करत आहेत.
-
मराठीतील दिग्गज संगीतकार अमितराज आणि चिनार-महेश या सिनेमाचे संगीत करत आहेत.
-
हिंदी मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक अमर मोहिले यांनी या चित्रपटाचे पार्श्वसंगीत केले आहे.
-
मंगेश कांगणे आणि मंदार चोळकर यांनी गीतलेखन केलं आहे.
-
नागराज दिवाकर यांनी छायांकन, तसेच अनेक पुरस्कार प्राप्त संकलक नीलेश गावंड यांनी या चित्रपटाच्या संकलनाची जबाबदारी सांभाळली आहे.
-
राष्ट्रीय पुरस्कार विजेते आणि ‘केजीएफ’सारख्या चित्रपटांचे अॅक्शन दिग्दर्शक विक्रम मोर, विख्यात नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य यांनी नृत्य दिग्दर्शन असून चित्रपटातील गाणी परदेशात चित्रित करण्यात आली आहेत.
-
कलादिग्दर्शन गिरीश कोळपकर यांनी केलं असून विशाल चव्हाण कार्यकारी निर्माता आहेत.
-
टीजरमध्ये थरारक बॅकग्राऊंड म्युझिकवर साखळ्या आणि पिस्तुल दिसते. त्यानंतर एक गोळी झाडली जाते.
-
त्याशिवाय पोस्टरवरील केतकी माटेगावकरचे करारी आविर्भावही दिसत असल्यानं या चित्रपटात अॅक्शनपॅक्ड थ्रीलर कथानक पहायला मिळणार याची खात्री पटते.
-
त्यामुळे या चित्रपटाविषयी आता उत्सुकता निर्माण झाली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : केतकी माटेगावकर / इन्स्टाग्राम)
Photos: केतकी माटेगावकर ‘या’ चित्रपटात साकारणार महत्त्वाची भूमिका; पहिलं पोस्टर आलं समोर
टीजरमध्ये थरारक बॅकग्राऊंड म्युझिकवर साखळ्या आणि पिस्तुल दिसते.
Web Title: Marathi actress singer ketaki mategaonkar upcoming movie ankush first look poster viral sdn