-  अमृता देशमुख आणि प्रसाद जवादेने गुपचूप साखरपुडा उरकला आहे. 
-  त्यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत चाहत्यांना ही गुडन्यूज दिली आहे. 
-  अमृता आणि प्रसादने त्यांच्या लग्नाची तारीखही जाहीर केली आहे. 
-  अमृता आणि प्रसादने शेअर केलेल्या या फोटोत त्या दोघांच्या हातात अंगठी पाहायला मिळत आहे. 
-  यावेळी प्रसादने गुलाबी रंगाचा शर्ट परिधान केला होता. तर अमृताने पांढऱ्या रंगाचा ट्रेडिनशल ड्रेस परिधान केला होता. 
-  “आम्ही साखरपुडा केला आहे. आम्ही दोघांनीही आयुष्यभर एकत्र एका टीममध्ये राहण्याचा निर्णय घेतलाय.” 
-  “तसेच आता आमच्या मार्गात येणारे कोणतेही कार्य पार पाडण्यास आम्ही सज्ज आहोत”, असे बिग बॉस स्टाईल कॅप्शन तिने या फोटोंना दिले आहे. 
-  अमृता आणि प्रसादने साखरपुड्याची गुडन्यूज दिल्यानंतर त्यांच्या फोटोवर अनेक कलाकार कमेंट करताना दिसत आहेत. 
-  तेजश्री प्रधान, प्रार्थना बेहेरे, अक्षय केळकर, सायली संजीव, तेजस्विनी पंडित, नम्रता संभेराव, प्रियांका केतकर, अश्विनी महांगडे यांसह अनेक कलाकारांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. 
-  अमृताने साखरपुड्याचे फोटो शेअर करत त्यांच्या लग्नाची तारीखही जाहीर केली आहे. 
-  येत्या १८ नोव्हेंबरला अमृता आणि प्रसाद लग्नबंधनात अडकणार आहेत. 
