-
मराठी सिनेसृष्टीतीत सध्या लगीनघाई सुरु आहे. नुकतंच लोकप्रिय अभिनेत्री-गायिका स्वानंदी टिकेकर साखरपुडा पार पडला.
-
स्वानंदी टिकेकरने प्रसिद्ध गायक आशिष कुलकर्णीबरोबर रिलेशनशिपची घोषणा केली होती.
-
त्यानंतर लगेचच त्या दोघांनी साखरपुडा करत चाहत्यांना सुखद धक्का दिला.
-
And We’re Engaged! असं कॅप्शन स्वानंदीने तिच्या साखरपुड्याचे फोटो पोस्ट केले होते.
-
त्यानंतर आता स्वानंदी आणि आशिषच्या साखरपुड्याचे काही फोटो समोर आले आहेत.
-
यात स्वानंदी आणि आशिषने साखरपुड्यासाठी खास लूक केल्याचे पाहायला मिळत आहे.
-
यावेळी स्वानंदीने गुलाबी रंगाचा लेहंगा आणि आशिषने निळ्या रंगाचा कोट परिधान केला आहे.
-
यात ते दोघेही अंगठी घालताना दिसत आहे.
-
स्वानंदी आणि आशिषच्या हातातील अंगठीच्या डिझाईनने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
-
स्वानंदी टिकेकर ही अभिनेते उदय टिकेकर आणि प्रसिद्ध शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर यांची मुलगी आहे.
-
स्वानंदीने ‘दिल दोस्ती दुनियादारी’, ‘दिल दोस्ती दोबारा’, ‘अस्सं माहेर नको गं बाई’ आणि ‘अगं अगं सुनबाई…’ या मालिकांमध्ये मुख्य भूमिका साकारली होती.
-
सोनी मराठीवरील ‘सिंगिंग स्टार’ या गायनाच्या कार्यक्रमाचे विजेतेपद स्वानंदीने पटकावले होते.
“फुलाची डिझाईन, डायमंड अन्…” स्वानंदी टिकेकरची साखरपुड्याची अंगठी पाहिलीत का?
स्वानंदी टिकेकरच्या साखरपुड्याच्या अंगठीचं डिझाईन आहे फारच खास, पाहा फोटो
Web Title: Marathi actress swanandi tikekar engagement ring design special singer ashish kulkarni photo nrp