-
करण जोहर दिग्दर्शित ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट २८ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.
-
या चित्रपटात अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणवीर सिंग मुख्य भूमिका साकारणार आहेत.
-
तसेच या चित्रपटात दिग्गज अभिनेत्री जया बच्चन, अभिनेते धर्मेंद्र, शबाना आझमी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
-
नुकताच या चित्रपटाचा प्रीमियर शो आयोजित करण्यात आला होता.
-
या चित्रपटाच्या प्रीमियर शोला काही बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती.
-
या वेळी आलिया आणि रणबीर कपूरने ‘टीम रॉकी आणि रानी’चे मॅचिंग काळ्या रंगाचे स्वेट-शर्ट परिधान केले होते. (Source: Varinder Chawla)
-
रणवीर सिंगने पांढऱ्या रंगाचा ‘टीम रॉकी आणि रानी’ लिहिलेला स्वेट-शर्ट परिधान केला होता. (Source: Varinder Chawla)
-
अभिनेत्री कतरिना कैफने पती विकी कौशलसह या चित्रपटाच्या प्रीमियर शोला हजेरी लावली. (Source: Varinder Chawla)
-
प्रीमियर शोसाठी अभिनेत्री अनन्या पांडेने रंगीबेरंगी शॉर्ट ड्रेस परिधान केला होता. (Source: Varinder Chawla)
-
आलियाची सासू नीतू कपूर यांनी रीमा कपूर जैनसह या प्रीमियर शोला हजेरी लावली होती. (Source: Varinder Chawla)
-
अभिनेत्री सारा अली खान आणि तिचा भाऊ इब्राहिम अली खान या प्रीमियर शोला उपस्थित होते. (Source: Varinder Chawla)
-
अभिनेता अभिषेक बच्चन प्रीमियर शोला निळ्या हुडी आणि डेनिम जीन्समध्ये आला होता. (Source: Varinder Chawla)
-
फॅशन डिझायनर सीमा सजदेहने या प्रीमियर शोला हजेरी लावली होती. (Source: Varinder Chawla)
-
अभिनेत्री करिश्मा कपूरने प्रीमियर शोसाठी काळ्या पॅण्ट-सूटवर गुलाबी ब्लेझर परिधान केले होते. (Source: Varinder Chawla)
-
अभिनेत्री कुशा कपिलाने काळ्या ड्रेसमध्ये प्रीमियर शोला हजेरी लावली. (Source: Varinder Chawla)
-
सध्या या चित्रपटाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : आलिया भट्ट आणि रणवीर सिंग / इन्स्टाग्राम)
Photos: ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटाच्या प्रीमियरला ‘या’ कलाकारांनी लावली हजेरी
या चित्रपटात अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणवीर सिंग मुख्य भूमिका साकारणार आहेत.
Web Title: Bollywood karan johar rocky aur rani kii prem kahaani movie premiere these celebrity attended show photos sdn