-
मराठी मनोरंजन विश्वात सध्या ‘सुभेदार’ चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे.
-
दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित बहुचर्चित ‘सुभेदार’ चित्रपट येत्या १८ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आला. या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
-
सुभेदार चित्रपटाच्या ट्रेलरमधील संवादांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
“हे संवाद ऐकून आमच्या अंगावर काटा आला” अशा प्रतिक्रिया प्रेक्षकवर्गाकडून दिल्या जात आहेत.
-
‘सुभेदार’ चित्रपटातील अंगावर शहारा आणणारे जाणून घेऊया…
-
“आमच्या लाडक्या कोंढण्यावरचे मुघलांचे निशाण…” राजमाता जिजाऊंच्या या वाक्याने ट्रेलरची सुरुवात होते.
-
“पुढच्या एका मासात जर कोंढाणा तुमच्या चरणाशी नाही वाहिला तर नाव शिवबा नाही सांगणार…” हा संवाद छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाऊंना उद्देशून म्हणतात.
-
“राजं म्या शबूत देतो तुम्हासनी… इथल्या मातीचा कणं अन् कणं स्वतंत्र ठेवण्यासाठी या मालुसरेच्या अंगातला रक्ताचा शेवटचा थेंबबी गळंल…जय भवानी!” – सुभेदार तानाजी मालुसरे
-
“आमच्या प्रेतांच्या पायऱ्या रचाया लागल्या तरी चालतील… पण, आऊसायबांचं पाय कोंढाण्याच्या दगडी पायठणाला लागायलाचं हवं” – सुभेदार तानाजी मालुसरे
-
“५०० गडी लयं झालं…” – सुभेदार तानाजी मालुसरे
-
“कोंढाण्याचं पान म्याचं उचलणार!” – सुभेदार तानाजी मालुसरे
-
“राजं आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं…” – सुभेदार तानाजी मालुसरे
-
हर मोहिमेत तुमच्यासारखं सोनं कुठवर उधळायचं आम्ही” महाराज हे तानाजीरावांना उद्देशून म्हणतात.
-
“म्या गेलो तर, शेकडो तानाजी भेटत्याल…पण, समध्यांना मार्ग दाखवायला एक शिवाजी राजं हवं ना…” तानाजी मालुसरे यांच्या या संवादाने ट्रेलरचा शेवट होतो.
“म्या गेलो तर, शेकडो तानाजी…”, ‘सुभेदार’ चित्रपटाच्या ट्रेलरमधील ‘हे’ संवाद ऐकून अंगावर येईल काटा
“कोंढाण्याचं पान म्याचं उचलणार!”, ‘सुभेदार’ चित्रपटाच्या ट्रेलरमधील ‘हे’ दमदार संवाद ऐकलेत का?
Web Title: Subhedar movie trailer release now these dialogues grabs attention sva 00