-
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री क्रांती रेडकरने २०१७ मध्ये एनसीबी अधिकारी समीर वानखेडेंशी लग्न केले.
-
क्रांती रेडकर आणि समीर वानखेडे दोघेही एकमेकांना १९९७ पासून ओळखत होते.
-
मुंबईतील रुईया कॉलेजमध्ये त्यांनी एकत्र महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. परंतु, तेव्हा दोघेही एकमेकांशी प्रचंड भांडायचे.
-
२००१ ला कॉलेज संपल्यावर दोघेही जवळपास ९ वर्षांनी म्हणजेच २०१० पुन्हा भेटले आणि त्यांच्यात मैत्री झाली.
-
क्रांती रेडकर आणि समीर वानखेडे दोघेही नुकतेच ‘कपल ऑफ थिंग्ज’ या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
-
यावेळी दोघांनी त्यांच्या लव्हस्टोरीबद्दल सांगितले आणि चाहत्यांबरोबर १९९७ पासूनचे जुने फोटो शेअर केले.
-
क्रांती कॉलेजच्या दिवसांमध्ये नाटकाची तालीम करून लेक्चर्सला हजर राहायची.
-
दुसरीकडे समीर वानखेडे कॉलेजमध्ये अत्यंत हुशार आणि वर्गात पहिल्या बाकावर बसायचे.
-
कॉलेजनंतर २०१० मध्ये पुन्हा भेट झाल्यावर दोघांनीही एकमेकांचे फोन नंबर घेतले. पुढे जवळपास ५ वर्षांनी दोघांनीही मनातील भावना व्यक्त करून २०१७ मध्ये लग्नगाठ बांधली.
क्रांती रेडकर आणि समीर वानखेडेंनी एकाच महाविद्यालयात घेतलं शिक्षण, पाहा १९९७ ते लग्नापर्यंतचे Unseen फोटो
क्रांती रेडकर आणि समीर वानखेडेंचे १९९७ पासूनचे फोटो पाहिलेत का?
Web Title: Kranti redkar and sameer wankhede shared unseen college days photos during interview sva 00