Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. popular marathi actress spruha joshi talk about her news anchoring experience pps

स्पृहा जोशीनं फक्त एक दिवस केलेलं ‘हे’ काम; म्हणाली, “त्या दिवशी माझा सगळा माज उतरला”

स्पृहा जोशीनं असं कोणतं काम केलं होतं? जाणून घ्या…

Updated: August 20, 2023 20:16 IST
Follow Us
  • अनेक एकांकिका, नाटक, मालिका, चित्रपट गाजवणारी हरहुन्नरी अभिनेत्री म्हणजे स्पृहा जोशी.
    1/12

    अनेक एकांकिका, नाटक, मालिका, चित्रपट गाजवणारी हरहुन्नरी अभिनेत्री म्हणजे स्पृहा जोशी.

  • 2/12

    स्पृहा ही उत्कृष्ट, गुणी व संवेदनशील अभिनेत्री असली तरी ती उत्तम कवयित्री सुद्धा आहे. शिवाय ती निवेदन खूप छान करते.

  • 3/12

    तिनं नाटक, मालिका, चित्रपट व्यतिरिक्त वेब सीरिज आणि बऱ्याच जाहिरातीमध्येही काम केलं आहे.

  • 4/12

    सध्या ती मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे.

  • 5/12

    अशा सर्वगुण संपन्न असलेल्या स्पृहा जोशीनं एकेदिवशी असं काही काम केलं होतं, ज्यामुळे त्या दिवशी तिचा सगळा माज उतरल्याचा अनुभव तिनं एका मुलाखतीतून सांगितला.

  • 6/12

    अलीकडेच स्पृहानं ‘अमूक तमूक’ या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली होती.

  • 7/12

    या मुलाखतीमध्ये तिनं एका वृत्तवाहिनीवर वृत्त निवेदनाचा अनुभव सांगितला.

  • 8/12

    स्पृहा म्हणाली की, “एका वृत्तवाहिनीचा एक उपक्रम होता, तो आता त्यांनी बहुतेक बंद केलाय. एक सेलिब्रिटी वृत्त निवेदक होऊन बातम्या सांगतो, हा त्यांचा उपक्रम होता. मी तिथे गेले होते. त्या दिवशी माझा सगळा माज उतरला. असं नाही की, मला टेलिप्रॉम्पटर वाचायची सवय नाहीये. मला त्याची सवय आहे आणि मला ते येतं. “

  • 9/12

    “पण त्या क्षणी त्या न्यूज रुममध्ये, त्या न्यूजच प्रेशर घेऊन बरीच माणसं तुमच्या कानात काहीतरी सांगतायत. त्यात फम्बल (fumble) न होणं हे अशक्य आहे आणि त्यात बऱ्याचदा चुकीचं लिहून येतं. त्यामुळे फम्बल होण्याची पूर्णतः शक्यता आहे. त्यामुळे वृत्त निवेदक फम्बल होत असतील तर ठीक आहे,” असं स्पृहा म्हणाली.

  • 10/12

    तसेच पुढे स्पृहा म्हणाली की, “वृत्त निवेदकाच काम खूप कठीण आहे. त्यावेळेस ते सांभाळून त्यांना या शिवायसुद्धा काहीतरी बोलायचं असतं. तुम्हाला फक्त बातमी वाचून चालत नाही, कनेक्शन तुमची तुम्हाला द्यायची असतात.”

  • 11/12

    “मला त्या वृत्तवाहिनीच्या त्या कार्यक्रमात मज्जा आली. तेव्हा मी हे म्हटलं होतं की, आतापर्यंत मला असं वाटलं होतं, यात काय आहे? समोरचं वाचूनच बोलायचं असतं. पण असं नाही. याचा मी खूप चांगला अनुभव घेतला आहे,” असं स्पृहा सांगितलं.

  • 12/12

    दरम्यान, स्पृहा जोशीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर सध्या तिचा ‘संकर्षण व्हाया स्पृहा’ हा कार्यक्रम जोरदार सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच तिची ‘लोकमान्य’ मालिका बंद झाली.

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsस्पृहा जोशीSpruh Joshi

Web Title: Popular marathi actress spruha joshi talk about her news anchoring experience pps

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.