-
विनोदवीर भाऊ कदम याचं नाव घराघरांत लोकप्रिय आहे. ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमामुळे त्याला एक वेगळी ओळख मिळाली. (फोटो : भाऊ कदम इन्स्टाग्राम )
-
विनोदाचं अचूक टायमिंग साधत भाऊ कदमने अनेकांची मनं जिंकली.
-
भाऊ कदम सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो.
-
त्याच्या इन्स्टाग्रामवर कुटुंबीयांबरोबरचे अनेक फोटो पाहायला मिळतात.
-
नुकतेच भाऊने त्याच्या लग्नाचे निवडक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
भाऊने पत्नी ममतासह शेअर केलेला पहिला फोटो हा लग्नाच्या आधीचा आहे. या फोटोमध्ये भाऊ कदमने शर्ट-पॅन्ट, तर ममता यांनी निळ्या रंगाची साडी नेसली आहे.
-
दुसरा फोटो हा लग्नातील असून यामध्ये दोघेही नटलेले दिसत आहेत. भाऊने यामध्ये सूट घातला आहे, तर ममता यांनी गुलाबी रंगाचा शालू नेसला आहे.
-
भाऊने शेअर केलेल्या फोटोंवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.
-
“एव्हरग्रीन जोडी”, “तुमचा साधेपणा खूप आवडला”, “आमचे हास्यसम्राट” अशा असंख्य कमेंट्स या फोटोवर नेटकऱ्यांकडून करण्यात आल्या आहेत.
“एव्हरग्रीन जोडी”, ‘चला हवा येऊ द्या’फेम भाऊ कदमच्या लग्नातील Unseen फोटो पाहिलेत का?
भाऊ कदमने शेअर केले लग्नातील फोटो; नेटकरी म्हणाले, “तुमचा साधेपणा…”
Web Title: Chala hawa yeu dya fame actor bhau kadam shared unseen photos of his marriage sva 00