Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. shree krishna janmashtami 2023 zee marathi actors shared memories of childhood dahi handi celebration photos sdn

Krishna Janmashtami 2023: झी मराठीच्या कलाकारांनी दिला कृष्ण जन्माष्टमीच्या लहानपणाच्या आठवणींना उजाळा

मराठी कलाकारांचा कृष्ण जन्माष्टमी उत्सव !

Updated: September 6, 2023 10:26 IST
Follow Us
  • Krishna Janmashtami 2023 Zee Marathi Actors
    1/22

    Shree Krishna Janmashtami 2023: भगवान श्री कृष्‍णाच्‍या जन्‍मानिमित्त जन्‍माष्‍टमी सण जल्‍लोषात साजरा केला जातो.

  • 2/22

    झी मराठीवरील कलाकारांनी देखील श्री कृष्ण जन्माष्टमीच्या लहानपणाच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

  • 3/22

    अभिनेता रोहित परशुराम (अर्जुन, अप्पी आमची कलेक्टर) म्हणतो, लहानपणी मी माझ्या गावात सगळ्यांसाठी कृष्णच होतो.

  • 4/22

    मी अगदी लहानपणा पासून दहीहंडी च्या कार्यक्रमामध्ये सहभागी असायचो ते अगदी कॉलेजच्या दिवसांपर्यंत मी त्याचा भाग राहिलो आहे.

  • 5/22

    आमच्या कॉलेजमध्ये दहीहंडी होत नव्हती, तेव्हा मी आमच्या शिक्षकांना विनंती करून कॉलेज मध्ये दही हंडीचा उत्सव सुरु केला आणि ती प्रथा अजूनही चालू आहे, आताही सगळी मुले कॉलेज मध्ये हा उत्सव उत्साहाने साजरा करतात.

  • 6/22

    जसजशी जन्माष्टमी जवळ यायची तसे मी आणि माझे मित्र वर्गणी जमा करायचो आणि हंडी फोडून झाली की सगळे मिळूनच मस्त वडापाव बनवायचो.

  • 7/22

    अश्या माझ्या कृष्ण जन्माष्टमीच्या सुंदर आठवणी आहेत.

  • 8/22

    अभिनेता हृषिकेश शेलार (अधिपती, तुला शिकवीन चांगलाच धडा) ह्याने सांगितले की, माझ्या बाबांना श्री कृष्ण खूप आवडतो, म्हणून त्यांनी माझे नाव हृषिकेश ठेवले, या गोष्टीचे मला फार अप्रूप आहे.

  • 9/22

    मला लहानपणी आई बाबा छान कृष्णा सारखा पोशाख घालायचे.

  • 10/22

    अजून एक शाळेतील रम्य आठवण म्हणजे आम्ही सगळे विद्यार्थी डब्बा आणायचो, तेव्हा शाळेत सगळ्याच्या डब्यातील पदार्थ एकत्र करून गोपाळकाला करायचो आणि मज्जेत, आनंदाने खायचो.त्या गोपाळकाल्याच्या किंवा प्रसादाची चव काही औरच असायची.

  • 11/22

    आजही ती डब्यातील चव जिभेवर रेंगाळते.

  • 12/22

    अभिनेता आयुष संजीव (वेदांत वानखेडे, ३६ गुणी जोडी) ह्याने आपल्या कृष्ण जन्माष्टमीच्या आठवणींना उजाळा देताना सांगितलं की, मी माटुंग्याला असतांना कृष्ण जन्माष्टमीच्या तसेच दही हंडीचा थरार अनुभवला आहे.

  • 13/22

    सगळे आमचे सवंगडी आम्ही एकत्र येऊन अत्यंत उत्साहाने दही हंडी फोडायचो.

  • 14/22

    एकदा तर मला प्रत्यक्ष शेवटच्या थरावर जाऊन दहीहंडी फोडायला मिळाली. तो फार अविस्मरणीय असा क्षण होता.

  • 15/22

    मी आजही त्या क्षणाने इतका भारवलेलो आहे की माझी एक मनापासूनची इच्छा आहे बॉलिवूडमध्ये मला संधी मिळाली तर प्रथम दहीहंडी फोडण्याचा प्रसंग किंवा गाणे असावे.

  • 16/22

    अजून एक छानशी आठवण म्हणजे लहानपणी आम्ही जेव्हा बदलापूरला राहायला गेलो तेव्हा तिकडे दहीहंडी फारशी कोणी साजरी करत नव्हते.

  • 17/22

    आम्हा दोघा भावंडांचा फारच हिरमोड झाला त्या वेळी मात्र आमच्या आईने घरामध्येच एक सुंदरशी दहीहंडी तयार करून आमच्या भावंडांच्या आनंद द्विगुणित केला आणि आम्ही अगदी उत्साहाने ती दही हंडी फोडली.

  • 18/22

    त्या वेळी माझ्या छोट्या भावाला कृष्णरूप दिले.

  • 19/22

    आयुष्यात ही गोष्ट एक मखमली आठवण म्हणून कायम लक्षात राहील.

  • 20/22

    श्री कृष्ण हा प्रेमसागर आहे, आपण जनमाणसानी हा एक गूण घेण्याची अत्यंत गरज आहे.

  • 21/22

    (सर्व फोटो सौजन्य : झी मराठी/इन्स्टाग्राम)

  • 22/22

    (हेही पाहा : ‘दार उघड बये’ मालिकेतील ‘मुक्ता’चा मंगळागौर विशेष लूक)

TOPICS
कृष्ण जन्माष्टमी २०२५Krishna Janmashtami 2025मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Shree krishna janmashtami 2023 zee marathi actors shared memories of childhood dahi handi celebration photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.