• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi content creator mrunal divekar talks about bad experience student faces in school by teachers hrc

“सर्वांसमोर मुलांचे कपडे काढणं, तोंडावर चिकटपट्टी लावणं अन्…”, एन्फ्लुएन्सर मृणाल दिवेकरचा संताप; म्हणाली, “शिक्षकांना…”

मृणाल दिवेकरने सांगितल्या शाळेतील वाईट आठवणी, शिक्षक मुलांना कसं वागवतात, याबद्दलही केला खुलासा

September 12, 2023 14:09 IST
Follow Us
  • Mrunal Divekar
    1/21

    मृणाल दिवेकर ही लोकप्रिय मराठी सोशल मीडिया स्टार आहे.

  • 2/21

     मृणालचे इन्स्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स आहेत. 

  • 3/21

    सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असलेल्या मृणालने नुकतीच एक मुलाखत दिली. 

  • 4/21

    एका ट्युशन टिचरने आपल्याला नग्न केलं होतं, असा धक्कादायक खुलासा मृणालने केला आहे.

  • 5/21

    माझ्या एका ट्युशन टिचरने मी होमवर्क केला नव्हता म्हणून मला नग्न केलं होतं. – मृणाल दिवेकर

  • 6/21

    त्यावेळी मी तिसरीत की चौथीत होते, माझं वय ९-१० वर्षे असेल. मी दोन-तीनवेळा होमवर्क केला नव्हता म्हणून असं केलं होतं. – मृणाल दिवेकर

  • 7/21

     सोबतच मृणालने ‘गप्पा मस्ती पॉडकास्ट’मध्ये तिच्या शाळेतील अनुभवही सांगितला. 

  • 8/21

    मी आधी कराडच्या एका शाळेत शिकत होते, तिथून नंतर इंटरनॅशनल स्कूलमध्ये गेले. – मृणाल दिवेकर

  • 9/21

    त्यामुळे दोन्ही शाळेतला फरक मला लवकर कळला. – मृणाल दिवेकर

  • 10/21

    दोन्ही ठिकाणी दिल्या जाणाऱ्या वागणुकीतला फरक कळला.- मृणल दिवेकर

  • 11/21

    कराडमध्ये होते तिथे मला खूप अडचणी होत्या. – मृणाल दिवेकर

  • 12/21

    . ते मला खूप तुच्छतेने वागवायचे. तिथले शिक्षक मारायचे, वाचता आलं नाही, गणित सोडवता आलं नाही तर ते खूप अपमान करायचे. – मृणाल दिवेकर

  • 13/21

    तिथून मी इंटरनॅशनल स्कूलमध्ये गेले. तिथे जी मुलं नाटक किंवा खेळात चांगली होती, त्यांचे एक वेगळे सेक्शन बनवले होते. – मृणाल दिवेकर

  • 14/21

    त्याचं कारण म्हणजे तुम्हाला जे जमतं ते करा, पण त्यात तुम्ही खूप चांगलं कराल याची खात्री करा, असं सांगायचे असं मृणाल म्हणाली.

  • 15/21

    कौशल्ये विकसित करण्यात दोन्ही ठिकाणी फरक होता.- मृणाल दिवेकर

  • 16/21

    एखाद्या मुलाला लिहायला, वाचायला नाही येत पण त्याच्यात दुसरे गुण असतील तर त्यात त्याला एक्सप्लोर करायला लावणं यात आपले शिक्षक व शिक्षण पद्धती कमी पडत आहे, असं मत मृणालने मांडलं.

  • 17/21

    लहान मुलांना सर्वांसमोर मारणं, त्यांचे कपडे काढणं, तोंडावर चिकटपट्टी लावणं या गोष्टींचे नंतर खूप आघात होतात. 

  • 18/21

    तणाव येतो, स्वतःवर शंका येते की मी चांगली आहे की नाही, मी हे चांगलं करतेय की नाही, लोक जज करतील का, असे विचार मनात येतात. 

  • 19/21

    शिक्षकांना तेव्हा याचे परिणाम माहीत नसतात, पण मुलांच्या मनावर या गोष्टींचे आघात बराच काळ राहतात, असं मृणाल म्हणाली.

  • 20/21

    तिने गप्पा मस्ती पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत हे सांगितलं. (सर्व फोटो – मृणाल दिवेकरच्या इन्स्टाग्रामवरून साभार)

  • 21/21

    हेही वाचा – प्रेम विवाह करूनही पत्नीपासून वेगळे का राहतात नाना पाटेकर? कोण आहेत त्यांच्या पत्नी? वाचा

TOPICS
फोटो गॅलरीPhoto GalleryमनोरंजनEntertainmentमराठीMarathi

Web Title: Marathi content creator mrunal divekar talks about bad experience student faces in school by teachers hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.