-
‘होणार सून मी ह्या घरची’, ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता शशांक केतकर याचा आज वाढदिवस.
-
शशांकने आपल्या दमदार अभिनयाने मनोरंजनसृष्टीत एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे.
-
आजवर त्याने मालिकांव्यतिरिक्त काही चित्रपट, नाटक आणि वेब सीरिजमध्ये काम केलं आहे.
-
अलीकडेच प्रदर्शित झालेली ‘स्कॅम २००३’ (Scam 2003) या हंसल मेहतांच्या वेब सीरिजमध्ये शशांक झळकला.
-
लवकरच शशांक करण जोहरच्या वेब सीरिजमध्ये देखील पाहायला मिळणार आहे.
-
पण अशा या लोकप्रिय शशांक केतकरवर एकेदिवशी एका ज्येष्ठ अभिनेत्याने टीका केली होती.
-
या ज्येष्ठ अभिनेत्याचा किस्सा शशांकने ‘मित्र म्हणे’ या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितला होता.
-
पण हा किस्सा सांगताना शशांकने त्या ज्येष्ठ अभिनेत्याचं नाव सांगितलं नव्हतं.
-
शशांकच्या पहिल्या नाटकाच्या वेळीचा हा किस्सा होता.
-
एका मुलखातीमध्ये त्या ज्येष्ठ अभिनेत्यानं शशांकवर टीका केली होती. ते म्हणाले होते की, “हे अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले आजचे आता व्यावसायिक नाटक करायला लागलेत. एक मालिका केली, आता हा नाटकात काम करतोय.”
-
या टीकेवर शशांक ‘मित्र म्हणे’च्या मुलाखतीमध्ये स्पष्टच बोलला. तो म्हणाला की, “तुम्ही पण कशाने तरी सुरुवात केली असेल ना, तर आम्ही टेलिव्हिजनने केली. पण याचा अर्थ असा होतं नाही की, आम्ही त्यासाठी लायक नाही आहोत किंवा आम्ही नाटक करणं वैध नाही, असं नाही होऊ शकत.”
-
पुढे अभिनेता म्हणाला की, “तुम्ही जी आता उदाहरणं देतायत की, तेव्हा शौचालय नसायचे, नीट सोयी नसायच्या, प्रवास आम्ही कसाही करायचो. खस्ता खाऊन आम्ही नाटक जिवंत ठेवलं. त्याबद्दल मला खूप आदर आहे. तुम्ही ते जिवंत ठेवलं म्हणून आज आम्ही करू शकतोय.”
-
“पण, आमच्याही पिढीनं आज तसंच केलं पाहिजे असं काही नाहीये. आमची पिढी आज मागणी करते आहे, तर त्याच्यामागे त्यांचीही काही कारणं असतील,” असं शशांक म्हणाला होता.
-
सध्या शशांक ‘स्टार प्रवाह’वरील ‘मुरांबा’ या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.
-
शशांकची ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतील पडली आहे.
“अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले…”; शशांक केतकरवर एका ज्येष्ठ अभिनेत्यानं केली होती टीका, वाचा किस्सा
अभिनेता शशांक केतकरची ‘या’ टीकेवर काय प्रतिक्रिया होती?
Web Title: Shashank ketkar birthday special story when senior actor criticized on him in the first play pps