-
अभिनेती परिणीती चोप्रा आणि ‘आप’चे नेते राघव चड्ढा लग्नबंधनात अडकले
-
२४ सप्टेंबरला राजस्थानच्या उदयपूरमधील ‘द लीला पॅलेस’मध्ये दोघांनी लग्नगाठ बांधली.
-
लग्नात परिणीतीने प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनिष मल्होत्राने डिझाईन केलेला लेहंगा घातला होता.
-
मनीष मल्होत्रा भारतातील प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहेत.
-
कियारा अडवाणी, उर्मिला मातोंडकर, प्रिती झिंटा, करीना सारख्या अनेक अभिनेत्रींनी आपल्या लग्नात मनीष मल्होत्रा यांनी डिझाईन केलेले कपडे घातले होते.
-
पण तुम्हाला माहिती आहे का, मनीष मल्होत्रा यांनी डिझाईन केलेला ड्रेस सगळ्यात पहिल्यांदा कुणी घातला होता.
-
अभिनेत्री अनन्या पांडेंची आई भावना पांडे यांनी सगळ्यात पहिल्यांदा मनीष मल्होत्रा यांनी डिझाईन केलेला ड्रेस घातला होता.
-
भावना पांडे यांनी १९९८ मध्ये अभिनेता चंकी पांडेबरोबर लग्न गाठ बांधली.
-
मनीष मल्होत्रा यांनी लग्नाच्या दिवशी भावना यांच्यासाठी निळ्या रंगाचा लेहेंगा तयार केला होता.
-
२०२० साली भावना पांडे यांनी एक फोटो शेअर करत याबाबतची माहिती दिली होती.
-
केवळ अभिनेत्रीच नाही तर बॉलीवूडमधील अनेक अभिनेत्यांनाही मनीष मल्होत्रा यांचे कपडे आवडतात.
-
कार्तिक आर्यन, रणवीर सिंह और विक्की कौशल सारखे अनेक कलाकार मनीष मल्होत्रा यांनी डिझाईन केलेल्या कपड्यामध्ये दिसून आले आहेत. (फोटो मनीष मल्होत्रा इन्स्टाग्रा, जनसत्ता)
प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी डिझाईन केलेला ड्रेस सगळ्यात पहिल्यांदा कुणी घातला होता माहिती आहे का? घ्या जाणून
परिणीतीच्या अगोदर अनेक अभिनेत्रींनी मनीष मल्होत्रा यांनी डिझाईन केलेले कपडे घातले आहेत.
Web Title: Parineeti chopra will wear manish malhotra designed lehenga in her wedding know who was first to wear this designer dress dpj