• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • सरन्यायाधीश भूषण गवई
  • PM नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. how saleel kulkarni dealt with gossips after getting divorce from wife avn

गॉसिप, नकारात्मक गोष्टींशी झुंज देणाऱ्या बाबाची कहाणी; घटस्फोटानंतर सलील कुलकर्णींनी ‘असा’ केलेला दोन मुलांचा सांभाळ

आपल्याहून बऱ्याच लहान तरुण मुलीबरोबर लग्न केल्याच्या अफवा त्यावेळी चांगल्याच पसरल्या होत्या व याचा त्रास सलील यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना झाला

October 31, 2023 16:21 IST
Follow Us
  • saleel-kulkarni9
    1/15

    सुप्रसिद्ध मराठी संगीतकार, गायक व दिग्दर्शक सलील कुलकर्णी हे सध्या चांगलेच चर्चेत आहेत.

  • 2/15

    नुकताच त्यांना त्यांच्या ‘एकदा काय झालं’ या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. संपूर्ण सिनेसृष्टीने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.

  • 3/15

    चित्रपट, मालिका, लाईव्ह शोज तसेच रीयालिटि शोजचे परीक्षक म्हणून वेगवेगळ्या माध्यमांमधून ते आपल्यासमोर आले आहेत.

  • 4/15

    संदीप खरे यांच्याबरोबरचा ‘आयुष्यावर बोलू काही’ या कार्यक्रमामुळे त्यांच्या लोकप्रियतेमध्ये आणखी भर पडली.

  • 5/15

    नुकतंच सलील कुलकर्णी यांनी पत्रकार सौमित्र पोटे यांच्या ‘मित्र म्हणे’ या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. यावेळी सलील यांनी वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारल्या.

  • 6/15

    राष्ट्रीय पुरस्कार घेताना काय भावना होता, तसेच लहान मुलांचं भावविश्व यासंदर्भातही त्यांनी बरीच चर्चा केली. या मुलाखतीदरम्यान सलील यांनी त्यांच्या घटस्फोटावरही भाष्य केलं.

  • 7/15

    २०१३ मध्ये जेव्हा त्यांनी आपल्या पत्नीपासून घटस्फोट घेऊन दोन मुलांना सांभाळायचं ठरवलं त्यावेळी त्यांना आलेले अनुभव आणि त्यांच्यावर झालेली टीका याबद्दल खुलासे केले आहेत.

  • 8/15

    सलील यांनी घटस्फोट घेतल्यानंतर त्यांच्याबद्दल वेगवेगळ्या अफवा बाहेर येत होत्या.

  • 9/15

    आपल्याहून बऱ्याच लहान तरुण मुलीबरोबर लग्न केल्याच्या अफवा त्यावेळी चांगल्याच पसरल्या होत्या व याचा त्रास सलील यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना झाला.

  • 10/15

    याविषयी बोलताना सलील म्हणाले, “जेव्हा मी वेगळं झालो त्यावेळी माझ्याबद्दल बरीच चर्चा झाली. आपल्या दोन मुलांना एकटा बाप वाढवणार आहे हे समजून घेण्याइतका समजूतदारपणा लोकांमध्ये का नसतो?”

  • 11/15

    पुढे सलील म्हणाले, “मी अजिबात या गोष्टीचा त्रागा करत नाहीये, पण त्याकाळात बड्याबड्या गायक गायिकांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांना याविषयी गॉसिप करताना पाहिलं आहे. कित्येकांनी तर मला तोंडावर येऊन विचारलं आहे की मी अमुक अमुक मुलीशी लग्न केलं आहे का?”

  • 12/15

    एकूणच समाजातील या वृत्तीबद्दल सलील यांनी भाष्य केलं. ते म्हणाले, “ही वृत्ती फार वाईट आहे, रस्त्यावर अपघात होऊन पडलेल्या व्यक्तीच्या हातून महागडं घडयाळ चोरायचीच ही वृत्ती आहे. अशा अडचणीत सापडलेल्या माणसाला जर तुम्ही मदत करत नसाल तर किमान त्याला त्याचा लढा लढू द्यावा.”

  • 13/15

    या सगळ्या प्रकारानंतर संदीप खरे यांनी सलील यांच्यासाठी खास पोस्ट लिहिली होती. ज्यात त्यांनी लिहिलं की, “तुम्ही त्याला कृपया त्रास देऊ नका, तो त्यांच्या मुलांचं प्रेमाने करतोय, अन् त्याने जर लग्न केलं तर तो तुम्हाला कळवेल.”

  • 14/15

    सामान्य लोकच नव्हे तर बऱ्याच सेलिब्रिटीजनीसुद्धा सलील यांना त्यांच्या दुसऱ्या लग्नाबद्दल थेट प्रश्न विचारल्याचंही त्यांनी या मुलाखतीमध्ये स्पष्ट केलं.

  • 15/15

    त्या काळात आपल्या दोन्ही मुलांचा आणि आपल्या आईचाही पाठिंबा असल्याने सलील या सगळ्या नकारात्मक गोष्टींमधून बाहेर येऊ शकले. (फोटो सौजन्य : सलील कुलकर्णी / इंस्टाग्राम पेज)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: How saleel kulkarni dealt with gossips after getting divorce from wife avn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.