-
OTT प्लॅटफॉर्मने प्रेक्षकांना एक नवीन प्रकारचे मनोरंजन दिले आहे. या प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणाऱ्या वेब सिरीज आणि चित्रपटांमध्ये प्रेक्षकांना वेगवेगळी पात्रं पाहायला मिळतात. यातील काही पात्रे इतकी अविस्मरणीय आहेत की, प्रेक्षक त्यांना कधीच विसरू शकत नाहीत. अशा अनेक कलाकारांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवर नकारात्मक भूमिका साकारून प्रेक्षकांच्या हृदयात आपले स्थान निर्माण केले आहे. या कलाकारांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना थक्क केले आहे. चला जाणून घेऊया अशाच काही अभिनेत्यांविषयी ज्यांनी OTT वर नकारात्मक भूमिका करून प्रेक्षकांना वेड लावले आहे.
-
अनिल कपूर
अनिल कपूरने ‘नाइट मॅनेजर’ या वेबसीरिजमध्ये नकारात्मक भूमिका साकारली आहे. त्याच्या व्यक्तिरेखेची दुसरी बाजू देखील या मालिकेत दिसून आली आहे जिथे तो आपल्या कुटुंबासाठी आणि मित्रांसाठी काहीही करण्यास तयार असतो. -
डिंपल कपाडिया
बॉलिवूड अभिनेत्री डिंपल कपाडियाने ‘सास बहू और फ्लेमिंगो’ या वेबसीरिजमध्ये नकारात्मक भूमिका साकारली आहे. या मालिकेत ती ड्रग माफिया, रक्तपात आणि गोळीबार करताना दिसली आहे. -
राशी खन्ना
राशि खन्ना अजय देवगणच्या ‘रुद्र: द एज ऑफ डार्कनेस’ या वेबसीरिजमध्ये नकारात्मक भूमिकेत दिसली आहे. राशीने या मालिकेत आलिया चोक्सी नावाची व्यक्तिरेखा साकारली आहे, जी एक मनोवैज्ञानिकरित्या प्रभावित डॉक्टर तसेच एक किलर आहे. -
शेफाली शहा
शेफाली शाहने ‘ह्युमन’ या वेबसीरिजमध्ये नकारात्मक भूमिका साकारली आहे. यामध्ये ती डॉक्टरची भूमिका साकारताना दिसत आहे. जिवंत माणसांवरील औषध चाचणी आणि वैद्यकीय घोटाळ्याचा मुद्दा या मालिकेत दाखवण्यात आला आहे. -
सुनील ग्रोव्हर
तांडव या वेबसिरीजमध्ये सुनील ग्रोव्हर नकारात्मक भूमिकेत दिसला आहे. या मालिकेत त्याने सैफ अली खानचा पर्सनल असिस्टंट गुरपाल सिंगची भूमिका साकारली होती, जी प्रेक्षकांना खूप आवडली होती. -
विजय वर्मा
विजय वर्मा यांनी अनेक वेब सीरिजमध्ये नकारात्मक भूमिका साकारल्या आहेत. सीरियल किलरपासून ते वाईट नवऱ्यापर्यंत त्यांनी आपल्या पात्रांना असे जीवदान दिले आहे की ते पाहिल्यानंतर तुम्हीही घाबरून जाल. ‘मिर्झापूर’, ‘दहाड’, , ‘डार्लिंग्स’, यांसारख्या मालिकांमध्ये नकारात्मक भूमिका साकारून त्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. -
बॉबी देओल
बॉबी देओलने ‘आश्रम’ या वेबसिरीजमध्ये निराला बाबाची नकारात्मक भूमिका साकारून प्रेक्षकांची मने जिंकली. या भूमिकेत त्याने आपल्या अभिनयाने असे योगदान दिले की सगळेच त्याचे कौतुक करताना दिसले.
शेफाली शहापासून अनिल कपूरपर्यंत, OTT वर नकारात्मक भूमिका साकारून हे कलाकार झाले लोकप्रिय
ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेल्या वेब सीरिजमध्ये दर्शकांना एकापेक्षा जास्त कॅरेक्टर पाहायला मिळतात. यातील अनेक कलाकारांनी वेब सीरिजमध्ये नकारात्मक भूमिका साकारून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना चकित केले आहे.
Web Title: Shefali shah to anil kapoor these actors became popular playing negative characters on ott jshd import snk