Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. shrikar pitre reveals gashmeer mahajani did not come to ravindra mahajani death incident place hrc

“गश्मीर महाजनी घटनास्थळी आला नव्हता, कारण…”, रवींद्र महाजनींच्या निधनाबद्दल श्रीकर पित्रेची पहिल्यांदा माहिती; म्हणाला….

गश्मीर महाजनीचा मित्र श्रीकर पित्रेचं रवींद्र महाजनींच्या निधनाबद्दल पहिल्यांदाच भाष्य

Updated: November 4, 2023 20:39 IST
Follow Us
  • gashmeer mahajani friend Shrikar Pitre talks about ravindra mahajani death
    1/18

    मराठी सिनेसृष्टीतील सर्वात देखणे अभिनेते अशी ओळख असलेले दिग्गज अभिनेते रवींद्र महाजनी यांचे जुलै महिन्यात निधन झाले.

  • 2/18

    रवींद्र महाजनी हे पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथील आंबी गावातील एका बंद फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळले होते.

  • 3/18

    रवींद्र महाजनी घरात एकटेच होते आणि घर आतून बंद होतं. त्यामुळे त्यांच्या निधनाची बातमी उशीरा समोर आली.

  • 4/18

    रवींद्र महाजनी यांचा मुलगा लोकप्रिय मराठी अभिनेता गश्मीर महाजनी होय.

  • 5/18

    गश्मीरला वडिलांच्या निधनाची बातमी पोलिसांनी दिल्याचं समोर आलं होतं.

  • 6/18

    पण गश्मीरनेच वडिलांच्या फ्लॅटवर आपल्याला पाठवलं होतं, असा खुलासा त्याचा जीवलग मित्र व अभिनेता श्रीकर पित्रे याने केला आहे.

  • 7/18

    रवींद्र महाजनी दार उघडत नसल्याचं कळताच श्रीकर तिथे पोहोचला होता. त्यानंतर तिथे काय घडलं होतं, याबाबत त्याने ‘अल्ट्रा मराठी बझ’ला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे. 

  • 8/18

    गश्मीर माझा शाळेपासूनचा मित्र आहे. एकेदिवशी संध्याकाळी त्याचा फोन आला. – श्रीकर पित्रे

  • 9/18

    ‘बाबा तळेगावला आहेत आणि दार उघडत नाहीयेत. तू जाऊन बघशील का’, असं तो म्हणाला. – श्रीकर पित्रे

  • 10/18

     मी म्हटलं काय झालं, तो म्हणाला, ‘अरे कधी कधी त्यांना खूप झोप लागते, ते दार उघडत नाहीत. मला घरमालकाचा फोन आला होता की ते दार उघडत नाहीयेत’. – श्रीकर पित्रे

  • 11/18

    मी त्याला जातो असं सांगितलं. मी माझा मित्र अक्षय साळुंकेला घेऊन तळेगावला निघालो. – श्रीकर पित्रे

  • 12/18

     गश्मीरचा पाच वाजता मला फोन आला होता, मी सहा वाजता तिथे पोहोचलो. तिथे गेल्यावर खाली पोलीस होते. ते पाहून काहीतरी गडबड आहे, असं मला वाटतं.- श्रीकर पित्रे

  • 13/18

    मी गश्मीरला फोन करून ताबडतोब निघायला सांगितलं. -श्रीकर पित्रे

  • 14/18

    तो म्हटला की तो आधीच निघाला आहे. त्याला मुंबईहून यायला जो वेळ लागला, त्या वेळेत त्याच्यावर काय बेतलं असेल त्याचा विचार करा. तो तिथून एकटा कार चालवत येत होता. मलाच त्याची काळजी वाटत होती. – श्रीकर पित्रे

  • 15/18

    अशा परिस्थितीत आपल्याला अंदाज असतो की काय घडलंय, पण ते आपण मानायला तयार नसतो कारण आपण ते पाहिलेलं नसतं. त्या काळात पोलिसांच्या फॉर्मॅलिटी पूर्ण करणं, रुग्णवाहिका बोलावणं आम्ही करत होतो.- श्रीकर पित्रे

  • 16/18

    पण नंतर पोलिसांनी सांगितलं की रक्ताचे नातेवाईक असल्याशिवाय आम्ही पुढची वैद्यकीय कारवाई करू शकत नाही. मी त्यांना गश्मीर येतोय असं सांगितलं. ते म्हणाले गश्मीर आल्यावर पुढची कारवाई करू. तोवर रात्र झाली होती, त्यामुळे ते दुसऱ्या दिवशी सकाळी करायचं ठरवलं. – श्रीकर पित्रे

  • 17/18

    “घटनास्थळी गश्मीर आला नाही, कारण आम्ही मृतदेह तिथून तळेगावच्या रुग्णालयात नेला होता. पोलिसांनी पुढची प्रकिया दुसऱ्या दिवशी करायचं ठरवल्याने आम्ही गश्मीरला तिकडेच थांबायला सांगितलं. – श्रीकर पित्रे

  • 18/18

    आम्ही त्याला वाटेत भेटलो तो म्हणाला, ‘मला थोडा वेळ द्या सगळं प्रोसेस करायला, कारण मला काहीच सुचत नाहीये’. मग परत आम्ही पुण्याला गेलो, तिथेच थांबलो व दुसऱ्या दिवशी सकाळी तळेगावच्या रुग्णालयात गेलो आणि पुढील सगळी कारवाई झाली – श्रीकर पित्रे (सर्व फोटो – गश्मीर महाजनी व श्रीकर पित्रेच्या इन्स्टाग्रामवरून साभार, रवींद्र महाजनी फोटो – संग्रहीत)

TOPICS
गश्मीर महाजनीGashmeer Mahajaniफोटो गॅलरीPhoto GalleryमनोरंजनEntertainment

Web Title: Shrikar pitre reveals gashmeer mahajani did not come to ravindra mahajani death incident place hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.