-
‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘रमा राघव’ या लोकप्रिय मालिकेतील अश्विनी म्हणजेच अभिनेत्री सोनल पवारने काल गुपचूप साखरपुडा उरकला.
-
सोनलचा मोठ्या थाटामाटात साखरपुडा पार पडला. याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
-
सोनल आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्याने साखरपुड्याच्या निमित्ताने खास हिरव्या रंगाचा पेहराव केला होता.
-
सोनलच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव समीर पालुष्टे असं आहे.
-
समीर पालुष्टे हा एक व्यावसायिक आहे.
-
तसेच समीर स्पार्कल्स मीडियाचा फाऊंडर व सीईओ आहे.
-
शिवाय सोनलचा होणारा नवरा डिजीटल मार्केटर व ब्रँड कन्सलटंट म्हणून काम करतो.
-
विशेष म्हणजे समीरला भारत सरकारच्या निवडणूक आयोगाकडून पुरस्कार मिळाला आहे.
-
सोनलच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिने ‘रमा राघव’ व्यतिरिक्त ‘तुला पाहते रे’, ‘घाडगे अॅण्ड सून’ या मालिकेमध्ये काम केलं आहे. तिची ‘तुला पाहते रे’ या मालिकेतील रुपालीची भूमिका चांगलीच गाजली होती.
‘रमा राघव’ मालिकेतील अभिनेत्रीच्या साखरपुड्याचे फोटो पाहिलेत का? होणारा नवरा कोण आहे जाणून घ्या…
‘या’ अभिनेत्रीचा थाटामाटात पार पडला साखरपुडा
Web Title: Marathi actress sonal pawar engagement with sameer paulaste photos goes viral pps