-
वर्षाचा शेवटचा महिना चालू आहे. या महिन्यात बॉक्स ऑफिसवर वर्षातील सर्वात मोठी स्पर्धा होत आहे. डंकी आणि सालार हे दोन्ही बहुप्रतिक्षीत चित्रपट बॉक्स ऑफिसवर स्पर्धा करतील. आज डंकी प्रदर्शित झालाय, तर सालार उद्या प्रदर्शित होणार आहे.
-
दोन्हीपैकी कोणता सिनेमा कोणावर वरचढ ठरतो हे लवकरच कळेल. मात्र, स्पर्धा केवळ दोन चित्रपटांमध्येच नाही, तर या दोघांच्या दिग्दर्शकांमध्येही आहे.
-
डंकीचे दिग्दर्शन राजू हिरानी यांनी केले आहे तर सालारचे दिग्दर्शन प्रशांत नील यांनी केले आहे. या दोघांनी आतापर्यंत केलेले सर्व चित्रपट सुपरहिट ठरले आहेत.
-
२००३ मध्ये मुन्ना भाई एमबीबीएस चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या हिरानी यांनी डंकीच्या आधी ५ चित्रपट केले आणि हे पाचही सुपरहिट आहेत.
-
प्रशांत नीलने २०१४ मध्ये पदार्पण केले आणि सालारपूर्वी ३ चित्रपट केले, जे तिन्ही चित्रपट खूप हिट ठरले आहेत.
-
राजू हिरानी यांच्या चित्रपटांना सरासरी २.४ कोटी प्रेक्षक मिळाले, तर प्रशांत नीलच्या चित्रपटांच्या प्रेक्षकांची संख्या २.२ कोटी होती.
-
जगभरातील कलेक्शनच्या बाबतीत राजू हिरानींच्या सर्व सिनेमांपैकी पीके हा सर्वाधिक ७६९.८९ कोटी कमाई करणारा होता. तर, प्रशांत नीलच्या चित्रपटांपैकी KGF 2 ने १२१५ कोटींची जागतिक स्तरावर सर्वाधिक कमाई केली आहे.
-
IMdB रेटिंगबद्दल बोलायचे झाले तर हिरानीच्या चित्रपटांचे सरासरी रेटिंग ८.१ आहे.
-
तर प्रशांत नीलच्या चित्रपटांचे सरासरी रेटिंग ८.२ आहे.
‘डंकी’ Vs ‘सालार’: केवळ चित्रपटच नाही तर दिग्दर्शकांमध्येही स्पर्धा, जाणून घ्या प्रशांत नील अन् राजू हिरानींबद्दल
राजू हिरानी यांच्या चित्रपटांना सरासरी २.४ कोटी प्रेक्षक मिळाले, तर प्रशांत नील यांच्या प्रेक्षकांची संख्या २.२ कोटी होती.
Web Title: Dunki vs saalar rajkumar hirani and prashanth neel know shahrukh khan prabhas directors filmography jshd import hrc