• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. nana patekar says once upon time sharad pawar was my hero hrc

“एकेकाळी शरद पवार माझे हिरो होते,” नाना पाटेकरांचे विधान; म्हणाले, “हिरो बदलले की…”

अजित पवारांबद्दल ‘तो’ प्रश्न विचारल्यावर नाना पाटेकरांनी केलेल्या वक्तव्याने वेधलं लक्ष

Updated: January 1, 2024 11:43 IST
Follow Us
  • Sharad Pawar Nana Patekar
    1/12

    अभिनेते नाना पाटेकर सध्या त्यांचा आगामी मराठी चित्रपट ‘ओले आले’मुळे चर्चेत आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने दिलेल्या मुलाखतीत त्यांनी राजकारणावर भाष्य केलं.

  • 2/12

    ‘झी २४ तास’ ला दिलेल्या मुलाखतीत नाना पाटेकर यांनी एकेकाळी शरद पवार त्यांचे हिरो होते, असा खुलासा केला.

  • 3/12

    अजित पवारांना खूप जवळून पाहत होतात, त्यांनी शरद पवारांची साथ सोडली, त्यानंतर तुमची काय प्रतिक्रिया होती? असा प्रश्न नाना यांना या मुलाखतीत विचारण्यात आला.

  • 4/12

    त्यावर ते म्हणाले, “मला कळतच नाहीये. मला राजकारणातील कोणत्याच गोष्टीबद्दल आता भाकित करताच येत नाहीये, बोलताच येत नाहीये.”

  • 5/12

    नाना पाटेकर पुढे म्हणाले, “मी एकेकाळी म्हणायचो शरद पवार माझे हिरो होते. आमच्या वयात १० वर्षांचं अंतर आहे. हा माणूस महाराष्ट्रासाठी काहीतरी ग्रेट करेल असं वाटायचं.”

  • 6/12

    “तुम्हाला जेव्हा तुमच्या कळत्या, न कळत्या वयात काही गोष्टी वाटत असतात आणि त्यावेळी तो माणूस सातत्याने काहीतरी करतोय तेव्हा तुम्हाला अजून आनंद होतो,” असं ते म्हणाले.

  • 7/12

    पुढे ते म्हणाले, “नंतर नंतर थोडासा भ्रमनिरास व्हायला लागतो.”

  • 8/12

    कारण तुमचीही राजकारणाबाबत काही ठाम मतं होऊ लागतात. ती बरोबर, चूक हा भाग अलाहिदा. – नाना पाटेकर

  • 9/12

    कालांतराने तुमचे हिरो बदलत राहतात. पण खेळातले वगैरे हिरो बदलले तर काही वाटत नाही. – नाना पाटेकर

  • 10/12

     पण इथे (राजकारणात) तुमचे कयास नसतात तर तुमच्या इच्छा असतात. इथे तुम्ही भावनिकरित्या खूप गुंतलेले असता. त्यामुळे इथे हिरो बदलले की वाईट वाटतं.- नाना पाटेकर

  • 11/12

    “एखाद्याच्या बोलण्यात सातत्य नसेल तर मी कसा विश्वास ठेवायचा?” असा प्रश्न नाना पाटेकरांनी उपस्थित केला.

  • 12/12

    (नाना पाटेकर फोटो – मल्हार पाटेकर फेसबूक, शरद पवार फोटो ANI)

TOPICS
नाना पाटेकरNana Patekarफोटो गॅलरीPhoto Galleryशरद पवारSharad Pawar

Web Title: Nana patekar says once upon time sharad pawar was my hero hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.