-
अमिताभ बच्चन रामनगरी अयोध्येत एक भव्य घर बांधणार आहेत.
-
यासाठी त्यांनी मुंबईतील डेव्हलपर द हाऊस ऑफ अभिनंदन लोढा यांच्याकडून सेव्हन स्टार टाउनशिप द सरयूमध्ये एक भूखंड खरेदी केला आहे.
-
‘हिंदुस्तान टाईम्स’च्या वृत्तानुसार, सूत्रांनी या भूखंडाची किंमत १४.५ कोटी रुपये असल्याचं सांगितलंय. तसेच त्याचा आकार १० हजार स्क्वेअर फूट आहे.
-
२२ जानेवारी रोजी ५१ एकरात पसरलेल्या सरयूचे उद्घाटन होणार आहे, त्याच दिवशी राम मंदिर ‘प्राण प्रतिष्ठा’ सोहळा होणार आहे.
-
या प्रकल्पातील आपल्या गुंतवणुकीबद्दल बोलताना अमिताभ बच्चन म्हणाले, “माझ्या हृदयात अयोध्या शहरासाठी विशेष स्थान आहे.”
-
“‘द हाऊस ऑफ अभिनंदन लोढा’ यांच्यासह ‘द सरयू’मध्ये घर बांधण्यासाठी मी उत्सुक आहे. अयोध्येतील अध्यात्म आणि सांस्कृतिक समृद्धीने भौगोलिक सीमा ओलांडून एक भावनिक बंध निर्माण केला आहे.” – अमिताभ बच्चन
-
“अयोध्येत परंपरा आणि आधुनिकता दोन्ही आहे. मी या जागतिक आध्यात्मिक राजधानीत माझे घर बांधण्यास उत्सुक आहे,” – अमिताभ बच्चन
-
‘एचओएबीएल’ चे अध्यक्ष अभिनंदन लोढा म्हणाले की राम मंदिरापासून अवघ्या १५ मिनिटांच्या अंतरावर आणि अयोध्या आंतरराष्ट्रीय विमानतळापासून ३० मिनिटांच्या अंतरावर असलेल्या सरयूचे पहिले नागरिक म्हणून अमिताभ बच्चन यांचे स्वागत करताना आनंद होत आहे.
-
दरम्यान, अमिताभ बच्चन यांनी भूखंड घेतलाय, त्या प्रकल्पाचे काम मार्च २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
-
मागच्या काही वर्षांपासून अयोध्येत मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांचा विकास होत आहे.
-
इथे राम मंदिर उभारण्याची घोषणा झाली तेव्हापासून अयोध्येत जमिनीच्या किमतीतही मोठी वाढ झाली आहे.
-
(सर्व फोटो – अमिताभ बच्चन इन्स्टाग्राम)
“परंपरा आणि आधुनिकता…”, अमिताभ बच्चन अयोध्येत बांधणार घर; खरेदी केला १४.५ कोटी रुपयांचा भूखंड
अमिताभ बच्चन यांनी राम मंदिर उद्घाटनापूर्वी अयोध्येत खरेदी केला भूखंड
Web Title: Ram mandir ayodhya opening amitabh bachchan buy plot ieghd import hrc