-
हिंदी टेलिव्हिजनवरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय शो ‘बिगबॉस’ चं १७ वं पर्व नुकतंच संपलं. काल २८ जानेवारीला यांचा ग्रँड फिनाले पार पडला.
-
तब्बल चार महिने सुरू असलेल्या या शोला त्याचा विजेता मिळाला आहे. ‘लॉकअप’ चे पहिले पर्व जिंकलेला मुनव्वर फारुकी ‘बिगबॉस १७’चा विजेता ठरला आहे. तर अभिषेक कुमार या शोचा उपविजेता ठरला.
-
दरम्यान, अनेक कलाकारांनी मुनव्वरला पाठिंबा दर्शवला होता. करण कुंद्रा आणि एमसी स्टॅन ही यातली मुख्य नावं आहेत.
-
शो जिंकल्यानंतर मुनव्वरने ट्रॉफीबरोबरचा फोटो शेअर केला आहे. त्याने फोटोच्या कॅप्शनमध्ये म्हटलंय, “तुमच्या सर्वांचे खूप खूप आधार. तुमच्याच पाठिंब्यामुळे ट्रॉफी अखेर डोंगरीला आलीच. मार्गदर्शनासाठी मोठे भाऊ सलमान खान यांने विशेष आभार.”
-
मुनव्वरच्या पोस्टवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. त्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरलही झाले आहेत. बिग बॉस १७ चा विजेता म्हणून मुनव्वरला ५० लाख रुपये आणि एक क्रेटा कार बक्षीस म्हणून मिळाली आहे.
-
दरम्यान, मुनव्वर फारुकी, अभिषेक कुमार, मनारा चोप्रा, अंकिता लोखंडे व अरुण माशेट्टी हे बिग बॉस १७ मधील टॉप पाच स्पर्धक होते.
-
सर्वात आधी अरुण घराबाहेर पडला, त्यानंतर अंकिता लोखंडे शर्यतीतून बाहेर झाली. मग मनारा चोप्रा बाहेर पडली. शेवटी अभिषेक व मुनव्वर हे टॉप स्पर्धक होते. त्यापैकी मुनव्वरने ट्रॉफी जिंकली.
-
मुनव्वर फारुकीच्या विजयानंतर त्याची एक्स गर्लफ्रेंड आयशा खानची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. आयशाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
-
कॉमेडियन आणि रॅपर मुनव्वर फारुकीने ‘बिग बॉस १७’ची ट्रॉफी जिंकली. त्यानंतर त्याचे चाहते सोशल मीडियावर त्याच्या अभिनंदनाच्या पोस्ट शेअर करत आहेत.
-
दरम्यान, ‘बिग बॉस १७’ च्या इतर स्पर्धकांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. या यादीत मुनव्वर फारुकीची एक्स गर्लफ्रेंड आयेशा खान हिचेही नाव आहे.
-
पत्रकारांनी मुनव्वर फारुकीच्या विजयाबद्दल विचारले असता, मुनव्वरबद्दल फारसे न बोलता आयशा अभिषेक कुमार आणि अंकिता लोखंडेला पाठिंबा देताना दिसली.
-
मुनव्वर फारुकीच्या विजयावर आयशा खान म्हणाली, ‘मी खूप आनंदी आहे, हे सार्वजनिक मत आहे, कोणीही जिंकलं तरीही मी आनंदी आहे…’ तर तिने सांगितले की तिला अभिषेकसाठी वाईट वाटले आणि अभिषेक जिंकावा अशी तिची इच्छा होती.
-
तसेच, अंकिताच्या एलिमिनेशनमुळेही ती खूश नव्हती. व्हायरल व्हिडीओमध्ये ती मुनव्वर वगळता सर्वांबद्दल मोकळेपणाने बोलताना दिसली.
-
मुनव्वरने माफी मागितली असली तरी आयशाच्या मनातील कटुता त्यांच्या बोलण्यातून दिसून येत होती.
-
आयशा खान ‘बिग बॉस १७’ या रिॲलिटी शोमध्ये वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून दिसली होती. तिने शोमध्ये येऊन खुलासा केला की ती मुनव्वर फारुकीची एक्स गर्लफ्रेंड आहे आणि तिने त्याच्यावर डबल डेटिंगचा आरोप केला होता. (Photos: Instagram)
Bigg Boss 17: मुनव्वर फारुकीच्या विजयावर एक्स-गर्लफ्रेंड आयशा खानची पहिली प्रतिक्रिया; म्हणाली, “मला वाईट वाटतंय…”
मुनव्वर फारुकीच्या विजयानंतर त्याची एक्स गर्लफ्रेंड आयशा खानची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
Web Title: Bigg boss 17 ex girlfriend ayesha khan first reaction to munawar farooqui win said i feel bad pvp