-
अभिनेत्री जुही चावलाने ‘अलीकडेच ‘झलक दिखला जा ११’ या डान्स रिॲलिटी शोमध्ये हजेरी लावली. यावेळी जुहीने शाहरुख खान आणि आमिर खानसोबतच्या तिच्या बॉन्डबद्दलही माहिती दिली.
-
“या मंचावर परत आल्याने खूप चांगलं वाटतंय. मी इथं सरोज खान आणि वैभवी मर्चंटसोबत शो जज केला होता. त्या दिवसांतही ही स्पर्धा अप्रतिम होती आणि अशा प्रकारचे उत्कृष्ट प्रदर्शन स्पर्धक करायचे,” असं जुही म्हणाली.
-
या मंचावर जुहीने आपल्या जुन्या आठवणी सांगितल्या. तसेच तिने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल किस्से सांगितले.
-
‘फालुदा विथ फराह’ या सेगमेंटमध्ये फराह खानने जुहीला पतीबद्दल प्रश्न विचारला.
-
“तू अनेक वर्षांपासून केसाच्या तेलाच्या ब्रँडची करत आहेस ज्याचा यूएसपी आहे की ते केस वाढवतात. मग तू तुझा नवरा जय मेहता यांच्या केसांना तेल का लावले नाहीस?” असं फराहने जुहीला विचारलं.
-
त्यावर जुही म्हणाली, “पती-पत्नी एकमेकांचं ऐकत नाहीत. त्यांनी माझं ऐकलं नाही आणि आता बघा त्यांचे हाल काय झालेत,” असं विनोदी उत्तर जुहीने दिलं.
-
यावेळी जुहीने जय मेहतांबरोबरच्या लव्ह स्टोरीचा खुलासा केला.
-
जुहीने लग्नाआधी पती जयसोबत प्रेमपत्रांची देवाणघेवाण केल्याचा खुलासा केला.
-
जुही चावला व उद्योगपती जय मेहता यांच्या लग्नाला २९ वर्षे झाली आहेत. तिने शोमध्ये तिची प्रेमकथा आणि तिच्या डेटिंग दिवसांबद्दल थोडीशी माहिती दिली.
-
जुहीने लग्नगाठ बांधण्यापूर्वी ते एकमेकांशी पत्रांची देवाणघेवाण कशी करत होते हे सांगितलं. “लग्नापूर्वी जय मला रोज पत्रं लिहायचा. लग्नानंतर हे सर्व थांबलं. आधी आम्ही एकमेकांना पत्रं आणि कार्ड पाठवायचो जे आता ईमेल आणि व्हॉट्सॲप मेसेजमध्ये बदलले आहे,” असं जुही म्हणाली.
-
“जय आणि मी एका डिनरला भेटलो आणि मग तो माझ्या मागे फिरू लागला. एकदा माझ्या वाढदिवशी त्याने मला लाल गुलाबांनी भरलेला ट्रक पाठवला. त्याला ‘हो’ म्हणायला मला एक वर्ष लागलं होतं,” असं जुहीने सांगितलं.
-
(फोटो – जुही चावला इन्स्टाग्राम)
केसाच्या तेलाची जाहिरात करतेस, मग पतीच्या डोक्याला का लावलं नाही? जुही चावला म्हणाली, “त्यांचे हाल…”
“झलक दिखला जा ११’ मध्ये जुही चावलाने वैयक्तिक आयुष्याबद्दल केले रंजक खुलासे
Web Title: Juhi chawla says after one year she said yes to jay mehta love story iehd import hrc