-
बॉलिवूडमधील कलाकार अनेकदा अभिनयाबरोबरच वेगवेगळ्या व्यवसायांमध्येही आपला हात आजमावताना दिसतात.
-
अनेक कलाकारांनी स्कीनकेअर प्रोडक्ट्स, तसेच कपड्यांच्या व्यवसायात मोठे यश मिळवले आहे.
-
यामध्ये अभिनेत्री शिल्पा शेट्टीचाही समावेश आहे. शिल्पाने तिचा पती राज कुंद्रासह मुंबईमध्ये ‘बॅस्टियान’ हे रेस्टॉरंट सुरू केलं होतं.
-
हे रेस्टॉरंट अतिशय भव्य असून ते दादर येथील कोहिनूर स्क्वेअरच्या 48व्या मजल्यावर बांधण्यात आले आहे.
-
त्याच्याच पाठोपाठ तिने बंगळुरूमध्ये एक नवे रेस्टॉरंट सुरू केले आहे. नुकतीच शिल्पाने या रेस्टॉरंटमध्ये पूजा केली आहे.
-
यासंबंधीचे फोटो आणि व्हिडीओ शिल्पाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत.
-
शिल्पाने या पोस्ट शेअर करत चाहत्यांबरोबर आपला आनंद व्यक्त केला आहे.
-
याच कारणाने शिल्पाचे हे रेस्टॉरंट येणाऱ्या पाहुण्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेणारे असेल असा सर्वांनाच विश्वास आहे.
-
( सर्व फोटो : अधिकृत शिल्पा शेट्टी इन्स्टाग्राम अकाऊंट)
मुंबई पाठोपाठ शिल्पा शेट्टीने ‘या’ शहरात सुरू केलं नवं रेस्टॉरंट; सोशल मीडियावर Photo Viral
अभिनेत्री शिल्पा शेट्टी ने पती राज कुंद्रासह मुंबईमध्ये ‘बॅस्टियान’ हे रेस्टॉरंट सुरू केलं होतं. आणि आता त्याच्या पाठोपाठ परत नवे रेस्टॉरंट सुरू केले आणि यासंबंधीचे फोटो आणि व्हिडीओ शिल्पाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत.
Web Title: After mumbai now shilpa shetty opened a new restaurant in this city photo viral on social media arg 02