• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. nita ambani red kanchipuram saree with initials of her son anant ambani and daughter in law radhika merchant pps

Photos: प्री-वेडिंग सोहळ्यात नीता अंबानींनी नेसलेल्या या कांचीपुरम साडीवर आहे लाडक्या लेकाचं अन् होणाऱ्या सूनेचं नाव! पाहा फोटो

नीता अंबानींच्या ‘या’ लाल रंगाच्या कांचीपुरम साडीची होतेय चर्चा

Updated: March 9, 2024 15:32 IST
Follow Us
  • मुकेश अंबानी व नीता अंबानी यांचे छोटे सुपुत्र अनंत अंबानी राधिका मर्चंटशी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. पण त्यापूर्वी १ मार्च ते ३ मार्च दरम्यान अनंत-राधिका यांचा प्री-वेडिंग सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. (फोटो सौजन्य - जनसत्ता)
    1/12

    मुकेश अंबानी व नीता अंबानी यांचे छोटे सुपुत्र अनंत अंबानी राधिका मर्चंटशी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. पण त्यापूर्वी १ मार्च ते ३ मार्च दरम्यान अनंत-राधिका यांचा प्री-वेडिंग सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. (फोटो सौजन्य – जनसत्ता)

  • 2/12

    देश-विदेशातील दिग्गज मंडळींच्या उपस्थितीत तीन दिवसांचा अनंत व राधिका यांचा प्री-वेडिंग सोहळा गुजरात येथील जामनगरमध्ये झाला. (फोटो सौजन्य – जनसत्ता)

  • 3/12

    अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग सोहळ्याच्या पहिल्या दिवशी, १ मार्चला जगप्रसिद्ध पॉप स्टार रिहानाचा परफॉर्मन्स पाहायला मिळाल. (फोटो सौजन्य – इंडियन एक्सप्रेस)

  • 4/12

    दुसऱ्या दिवशी संगीत सोहळा झाला. यामध्ये बॉलीवूडच्या सेलिब्रिटींनी जबरदस्त परफॉर्मन्स केला. बॉलीवूडचे तीन खान ‘नाटू नाटू’ या गाण्यावर डान्स करताना दिसले. तर रणबीर कपूर-आलिया भट्ट आकाश अंबानी-श्लोका मेहतासह ‘केसरिया’ या गाण्यावर थिरकले. (फोटो सौजन्य – जनसत्ता)

  • 5/12

    तिसऱ्या दिवशी, ३ मार्चला ‘टस्कर ट्रेल्स’ आणि ‘हस्ताक्षर’ कार्यक्रम झाला. ‘टस्कर ट्रेल्स’ हा आउटडोअर कार्यक्रम होता. ज्याद्वारे पाहुण्यांना जामनगर, वनतारा फिरवलं. रात्री भव्य महाआरती आणि अनंत-राधिका यांची हस्ताक्षर सेरेमनी पार पडली. यानंतर स्वरांची उधळण झाली. प्रसिद्ध गायकांनी आपल्या सुमधूर आवाजाने पाहुण्यांना मंत्रमुग्ध केलं आणि नाचायलाही भाग पाडलं. (फोटो सौजन्य – जनसत्ता)

  • 6/12

    या तीन दिवसांच्या सोहळ्यानंतर ६ मार्चला जामनगरमध्येच अंबानींनी खास रिलायन्स कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी देखील अनेक कलाकार मंडळी पाहायला मिळाले. (फोटो सौजन्य – नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर इन्स्टाग्राम)

  • 7/12

    ६ मार्चच्या या कार्यक्रमात नीता अंबानी लाल रंगाच्या कांचीपुरम साडीत दिसल्या. (फोटो सौजन्य – नीता अंबानी फॅन पेज)

  • 8/12

    नीता अंबानींची ही सुंदर कांचीपुरम साडी प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनिष मल्होत्राने डिझाइन केली होती. (फोटो सौजन्य – नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर इन्स्टाग्राम)

  • 9/12

    कांचीपुरम साडीतला नीता अंबानींच्या या लूकची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. पण नीता यांच्या या साडीवर लाडका लेक अनंत व होणारी सून राधिकाचं नाव आहे, हे तुम्हाला माहितीये का? (फोटो सौजन्य – नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर इन्स्टाग्राम)

  • 10/12

    नीता अंबानींच्या या लाल रंगाच्या साडीच्या किनारीवर अनंत व राधिकाच्या नावाचं पहिलं अक्षर ‘अR’ असं लिहिण्यात आलं आहे. (फोटो सौजन्य – नीता अंबानी फॅन पेज)

  • 11/12

    दरम्यान, अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचा लग्नसोहळा जुलै महिन्यात असणार आहे. (फोटो सौजन्य – नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर इन्स्टाग्राम)

  • 12/12

    १२ जुलैला अनंत व राधिका यांचा मुंबईत शाही लग्नसोहळा होणार असल्याची चर्चा सुरू आहे. (फोटो सौजन्य – नीता अंबानी फॅन पेज)

TOPICS
अनंत अंबानीAnant Ambaniनीता अंबानीNita AmbaniमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमुकेश अंबानीMukesh Ambani

Web Title: Nita ambani red kanchipuram saree with initials of her son anant ambani and daughter in law radhika merchant pps

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.