-
Beast
थलपती विजयच्या ‘बीस्ट’ या चित्रपटावर कुवेत आणि कतारमध्ये बंदी घालण्यात आली होती. हा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता. (PC : Still from FIlm/Jansatta) -
FIR
विष्णू विशाल स्टारर क्राईम थ्रिलर चित्रपट ‘एफआयआर’वर कुवेत, मलेशिया आणि कतार सारख्या देशांमध्ये बंदी घालण्यात आली आहे. हा चित्रपट तुम्ही Amazon Prime वर पाहू शकता.(PC : Still from FIlm/Jansatta) -
Kabali
रजनीकांत आणि राधिका आपटेच्या कबाली या चित्रपटावर मलेशियामध्ये बंदी घालण्यात आली होती. विशेष म्हणजे या चित्रपटाचं संपूर्ण चित्रीकरण मलेशियात करण्यात आलं होतं. हा चित्रपट तुम्ही Amazon Prime वर पाहू शकता. (PC : Jansatta) -
Kaathal – The Core
मामुट्टी आणि ज्योतिकाचा ‘काथल – द कोअर’ या समलैंगिकतेवर आधारित चित्रपटावर आखाती देशांमध्ये बंदी घालण्यात आली होती. हा चित्रपट Amazon Prime Video वर उपलब्ध आहे.(PC : Still from FIlm/Jansatta) -
Monster
मोहनलाल स्टारर ‘मॉन्स्टर’ चित्रपटावर आखाती देशांमध्ये बंदी घालण्यात आली होती. हा चित्रपट तुम्ही Amazon Prime Video वर पाहू शकता.(PC : Still from FIlm/Jansatta) -
Kurup
दुल्कर सलमान आणि शोभिता धुलिपाला स्टारर क्राईम थ्रिलर चित्रपट ‘कुरूप’वर कुवेतमध्ये बंदी घालण्यात आली आहे. हा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.(PC : Still from FIlm/Jansatta) -
Sita Ramam
मृणाल ठाकूर आणि दुल्कर सलमान स्टारर ‘सीता रामम’ चित्रपटावर UAE, सौदी अरेबिया, कुवेत, कतार, बाहरीन आणि ओमान व्यतिरिक्त अनेक देशांमध्ये बंदी घालण्यात आली आहे. हा चित्रपट तुम्ही प्राइम व्हिडिओवर पाहू शकता. (PC : Still from FIlm/Jansatta) -
Vishwaroopam
कमल हासनचा स्पाय ॲक्शन थ्रिलर चित्रपट ‘विश्वरूपम’वर यूएई आणि मलेशियामध्ये बंदी घालण्यात आली होती. हा चित्रपट तुम्ही Amazon Prime आणि Disney Plus Hotstar वर पाहू शकता. (PC : Still from FIlm/Jansatta)
परदेशात बंदी असलेले ‘हे’ ८ दाक्षिणात्य चित्रपट OTT वर उपलब्ध; रजनीकांत, थलपतीच्या चित्रपटांचाही समावेश
परदेशात बंदी घालण्यात आलेले अनेक दक्षिण चित्रपट आहेत, परंतु तुम्ही ते OTT प्लॅटफॉर्मवर पाहू शकता. धार्मिक भावना दुखावणे, हिंसाचाराचे चित्रण करणे आणि राजकीयदृष्ट्या संवेदनशील मुद्दे मांडणे यासह विविध कारणांमुळे या चित्रपटांवर विदेशात बंदी घालण्यात आली होती.
Web Title: Beast to monster these south films banned abroad are available on ott jshd import asc