-
मराठी मालिकांमध्ये वेगवेगळे सणउत्सव जल्लोषात साजरे केले जातात. यासंबंधीचे विशेष भागही आपल्याला पाहायला मिळतात.
-
झी मराठी वाहिनीवरील मालिकांमध्ये नववर्षाचा उत्साह पाहायला मिळाला. प्रत्येक मालिकेमध्ये गुडी उभारून मराठी नव वर्षाचं स्वागत केलं आहे.
-
‘शिवा’ मालिकेत गुढीपाडवा कसा साजरा केला गेला आहे हे जाणून घेऊया. एका लहान मुलाला वाचवताना शिवाच्या हाताला दुखापत झाली. यामुळे रामभाऊ तिला घरी यायला सांगतात. शिवाला घरी पाहून आशु आश्चर्यचकित होतो. तर दुसरीकडे आशु गुढी उभारत असताना त्याच्या हातून गुढी सुटते आणि नेमकी त्याचवेळेस शिवा ती सांभाळते. त्यामुळे योगायोगाने आशु आणि शिवाच्या हातून गुढी उभारली जाते. ही नव्या नात्याची सुरुवात असणार का?
-
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मध्ये अक्षरा फुलपगारे सर बेपत्ता झाल्याची पोलिसात तक्रार करते. त्याआधीच भुवनेश्वरी अक्षराची ही तक्रार खोटी ठरवत फुलपगारे सरांना समोर उभं करते. त्यामुळे अक्षराला भुवनेश्वरीची माफी मागावी लागते.
-
फॅक्टरी मध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी कामगार आग्रह करतात की गुढी अक्षराच्या हातून उभारली जावी. हे कळल्यावर भुवनेश्वरीला राग येतो. ह्या वर्षी अक्षरा गुढी उभारून कामगारांना भेट म्हणून पुस्तकं देणार आहे.
-
‘पारू’ ह्या मालिकेत पारू बाहेर गेली असताना क्लायंट ब्रँड अम्बॅसॅडर बरोबरच्या फोटोची मागणी होते. अखेर पारूला शोधून आणलं जातं.
-
पारू घाबरलेल्या अवस्थेत फोटो शूटसाठी तयार होते. नेमका हा दिवस आहे पाडव्याचा. पारूचं अहिल्यादेवीच्या वेशात फोटोशूट होतं आणि त्याचवेळी तिच्या हातून गुढीची पूजाही पार पडते.
-
‘अप्पी आमची कलेक्टर’ मालिकेत अप्पीला विश्वास बसतो की, रुपालीच अमोलची व्यवस्थित काळजी आणि संभाळ करू शकते. तेव्हा ती रूपालीला अमोल हा तुमचा पण मुलगा असल्याचे म्हणते.
-
अमोलला आपण दोघी मिळून सांभाळू असेही ती सांगते. हे पाहून घरचे खुश होतात आणि अर्जुन-अप्पी व स्वप्निल-रुपाली अमोलचे आईबाबा आणि मोठ्ठे आईबाबा म्हणून अमोलला सांभाळायचे ठरवतात आणि पूर्ण परिवार मिळून गुढी पाडव्याचा सण साजरा करतात.
-
अप्पी आणि रुपाली दोघी मिळून अमोलची काळजी घेतात. त्याला अंघोळ वगेरे घालून तयार करतात आणि मग अर्जुन आणि अप्पी, स्वप्निल-रुपाली गुढी उभारतात.
-
‘सारं काही तिच्यासाठी’ मध्ये निशी-नीरजचा साखरपुडा शुभ गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर झाला आहे.
-
अशा प्रकारे झी मराठी वाहिनीवरील मालिकांमध्ये वेगवेगळ्या ट्विस्टसह यंदाचे नववर्ष साजरे झाले आहे.
Gudi Padwa 2024: झी मराठीच्या मालिकांमध्ये नववर्षाचा जल्लोष; ‘या’ ट्विस्टसह दणक्यात साजरा झाला ‘गुडीपाडवा’
झी मराठी वाहिनीवरील मालिकांमध्ये नववर्षाचा उत्साह पाहायला मिळाला. प्रत्येक मालिकेमध्ये गुडी उभारून मराठी नव वर्षाचं स्वागत केलं आहे.
Web Title: Gudi padwa 2024 zee marathi serials celebrate marathi new year gudipadwa celebrated with amazing new twists pvp