-
‘राजा राणीची गं जोडी’ या गाजलेल्या मालिकेतून घराघरांत लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजेच शिवानी सोनार.
-
गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर शिवानीने साखरपुडा उरकल्याची आनंदाची बातमी नुकतीच तिच्या चाहत्यांना दिली.
-
शिवानी सोनारच्या साखरपुड्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
-
अभिनेत्रीचा होणारा नवरा सुद्धा मराठी मालिकाविश्वातील एक लोकप्रिय अभिनेता आहे.
-
‘रंग माझा वेगळा’ या स्टार प्रवाहच्या गाजलेल्या मालिकेत अंबर गणपुळे याने आदित्य ही भूमिका साकारली होती.
-
याशिवाय ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘लोकमान्य’ या मालिकेत अंबरने गोपाळ गणेश आगारकर यांची भूमिका साकारली होती.
-
अंबरने काही शॉर्ट फिल्म्समध्येही काम केलं आहे.
-
शिवानी सोनार आणि अंबर गणपुळे यांनी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर गुपचूप साखरपुडा उरकत चाहत्यांना सुखद दिला होता.
-
९. आता लवकरच ही जोडी लग्नबंधनात अडकणार आहे. ( सर्व फोटो सौजन्य : शिवानी सोनार इन्स्टाग्राम व @ thereelfarm )
Photos : राजा राणीची गं जोडी! शिवानी सोनारने गुपचूप उरकला साखरपुडा, तिचा होणारा नवरा आहे तरी कोण?
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री शिवानी सोनारने उरकला साखरपुडा, तिच्या नवऱ्याबद्दल जाणून घ्या…
Web Title: Raja ranichi ga jodi fame shivani sonar engaged with ambar ganpule photos viral sva 00