-
प्रसिद्ध मल्याळम अभिनेत्री अपर्णा दास लग्नबंधनात अडकली आहे.
-
तिचा पती हा सुप्रसिद्ध मल्याळम अभिनेता दीपक परंबोल आहे.
-
अपर्णा व दीपक यांनी आज (२४ एप्रिल) लग्नगाठ बांधली.
-
केरळमधील गुरुवायूर मंदिरात मल्याळम रितीरिवाजांनुसार दीपक आणि अपर्णाचा विवाह झाला.
-
केरळमध्ये झालेल्या या पारंपारिक लग्नाला फक्त दीपक आणि अपर्णा यांच्या कुटुंबातील सदस्य आणि खास मित्रांनी हजेरी लावली होती.
-
अपर्णाने लग्नात पांढरी साडी नेसली व त्यासोबत मॅचिंग हिरवं ब्लाऊज घातलं होतं. तर दीपकने पांढरी लुंगी व शर्ट घातला होता.
-
लग्नाच्या फोटोंमध्ये दोघेही खूपच सुंदर दिसत आहेत.
-
अपर्णा २८ वर्षांची आहे तर दीपक ३५ वर्षांचा आहे.
-
२०१९ मध्ये आलेल्या ‘मनोहरम’ सिनेमाच्या सेटवर त्यांची भेट झाली होती.
-
अपर्णा दासने मल्याळम चित्रपट ‘नजन प्रकाशन’मधून पदार्पण केलं आणि मनोरम या चित्रपटातून तिला प्रसिद्धी मिळाली. थलपथी विजयच्या ‘बीस्ट’ या चित्रपटात तिने महत्त्वाची भूमिका साकारली होती.
-
तर, दीपकचा मंजुमेल बॉइज २०२४ सर्वात हिट मल्याळम चित्रपटांपैकी एक आहे.
-
(सर्व फोटो – अपर्णा दास व Elementricx इन्स्टाग्रामवरून साभार)
पाच वर्षांच्या अफेअरनंतर सुप्रसिद्ध अभिनेत्रीने मंदिरात केलं लग्न, सात वर्षांनी मोठा आहे पती, लग्नाचे फोटो आले समोर
अभिनेत्रीने २८ व्या वर्षी बांधली लग्नगाठ, फोटो सोशल मीडियावर चर्चेत
Web Title: Actress aparna das married to actor deepak parambol wedding photos out from guruvayur temple hrc