-
संजय लीला भन्साळी यांची पहिली वेब सिरीज हीरामंडी ही १ मे रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली आहे. या वेब सीरिजमध्ये अभिनेत्री मनीषा कोईराला मुख्य भूमिकेत आहे. या वेब सिरीजमध्ये मनीषा कोईराला ‘मल्लिकाजान’ची भूमिका साकारताना दिसत आहे.
-
मल्लिकाजानची व्यक्तिरेखा साकारणे मनीषा कोईरालासाठी सोपे नव्हते. अभिनेत्रीने या भूमिकेसाठी उर्दू भाषा शिकली आहे. दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या सोबत काम करणे प्रत्येकाला जमत नाही. अगदी मनीषा कोईराला यांनाही एक सीन उत्तम प्रकारे शूट करण्यासाठी तब्बल सात तास लागले होते.
-
झूम टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत, मनीषा कोईरालाने खुलासा केला की या वेब सीरिजमध्ये काही सीन शूट करणे खूप कठीण होते. खासकर काही सुरुवातीच्या दृश्यांच्या शूटिंगसाठी खूप मेहनत घ्यावी लागली.
-
मनीषा कोईराला यामुळ नेपाळच्या आहेत, त्यामुळे त्यांना हिंदी भाषा बोलणें सोपे जाते. मात्र, हिरामंडीत त्यांना उर्दू भाषा बोलावी लागली. त्यासाठी त्यांनी एका शिक्षकाच्या मदतीने उर्दू भाषा शिकली. याशिवाय मनीषा कोईरालाने सांगितले की, त्यांची आजी एक डान्सर होती. त्यामुळे मी माझ्या आजीकडून मल्लिकाजनच्या भूमिकेसाठी प्रेरणा घेतली.
-
मनीषा कोईराला यांनी हे ही सांगितले की, एका सीनसाठी त्या ७ तास एकाच जागी बसल्या होत्या आणि हे त्याच्यासाठी सोपे नव्हते, कारण मनीषा कोईराला कॅन्सरशी लढा देत आहे. त्यामुळे तब्येतीचा विचार करून त्यांना काम करावे लागले आहे. हिरामंडीमधील एका सीनमध्ये मनीषा कोईराला मेहंदी लावत आहे ज्यासाठी त्या तासनतास बसल्या होत्या.
-
हिरामंडी वेब सिरीज भारतातच नाही तर परदेशातही पसंत केली जात आहे. त्यासाठी अमूलने या वेबसिरीजसाठी एक जाहिरात तयार केली आहे ज्यामध्ये त्यांनी हिरामंडीचे पोस्टर बनवले आहे आणि एक खास टॅगलाइन देखील दिली आहे.
Photos: अभिनेत्री मनिषा कोईरालाने हीरामंडीच्या एका शॉटसाठी दिले होते ‘सात तास’ ; वाचा शूटिंग दरम्यानचा हा खास किस्सा
दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांची पहिली वेब सिरीज ‘हीरामंडी’ नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होऊन आता एक आठवडा पूर्ण झाला आहे आणि या वेबसिरीजला प्रेक्षकांकढून चांगला प्रतिसादही मिळाला आहे, आणि याच संदर्भात अभिनेत्री मनीषा कोईरालाने वेबसिरीजमधील आपल्या भूमिकेबद्दल एक खास खुलासा केला आहे.
Web Title: Actress manisha koirala gave seven hours for one shot in heeramandi read this exclusive story of heeramandi while shooting arg 02