-
बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता यांची मुलगी आणि प्रसिद्ध फॅशन डिझायनर अभिनेत्री मसाबा गुप्ता तिच्या आयुष्यातील सर्वात सुंदर वेळ एन्जॉय करत आहे. अभिनेत्री लवकरच आपल्या पहिल्या मुलाचे स्वागत करणार आहे.
-
अलीकडेच मसाबा आणि नीना गुप्तासोबत एका इव्हेंटमध्ये अतिशय स्टायलिश अंदाजात पोहचल्या होत्या. यावेळी या आई-मुलीची जोडी खूपच क्यूट दिसत होती.
-
अनेकदा अभिनेत्री नीना गुप्ता तिच्या मतांबद्दल मोकळेपणाने बोलताना दिसते. आपल्या जे वाटतं ते सांगायला नीना गुप्ता कधीच कचरत नाही.
-
एका मुलाखतीत नीना गुप्ता यांनी आपल्या मुली मसाबाचे पहिले लग्न तुटण्याचे कारण सांगितले होते. मसाबाचे पहिले लग्न त्यांच्यामुळेच तुटल्याचे असं त्या म्हणाल्या.
-
नीना म्हणाल्या की ”जर मी आई म्हणून नव्हे तर मित्र म्हणून विचार केला असता तर कदाचित हे घडले नसते जेव्हा मसाबाचे लग्न झाले, तेव्हा तिला खरे तर लग्न करायचे नव्हते.”
-
अभिनेत्री पुढे म्हणाल्या, “तिला तिच्या पहिल्या पतीसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहायचे होते. पण त्यादरम्यान कुठेतरी मी आईसारखी बनले.”
-
“मी मसाबाला सांगितले की नाही, तू लग्न करेपर्यंत त्याच्यासोबत राहू शकत नाहीस. असे मी स्पष्ट सांगितले कारण मसाबाने तीच चूक करावी असे मला वाटत नव्हते आणि यानंतर मसाबाचे लग्न झाले.” असं निना गुप्ता यांनी सांगितले.
-
मात्र, हे लग्न केवळ चार वर्षे टिकले. नीना म्हणाल्या, “जेव्हा मसाबाने मला घटस्फोटाबद्दल सांगितले तेव्हा मी महिनाभर धक्क्यात होते, असं वाटलं की जणू माझ्याकडे काहीच उरले नव्हते. तो काळ खूप कठीण होता.” यामुळेच नीना स्वतःला दोष देतात.
-
मसाबाचे पहिले लग्न २०१५ मध्ये निर्माते मधु मंतेनासोबत झाले होते, पण दोघेही २०११ मध्ये वेगळे झाले. त्यानंतर मसाबाने २०२३ मध्ये सत्यदीप मिश्रासोबत दुसरे लग्न केले.
(सर्व फोटो स्त्रोत: @masabagupta/instagram)
Photos: प्रसिद्ध फॅशन डिझायनर मसाबाचे पहिले लग्न का मोडले? नीना गुप्ता म्हणाल्या ‘माझी चूक आहे’…
बॉलीवूड अभिनेत्री नीना गुप्ता यांनी आपली मुलगी मसाबा गुप्ताच्या पहिलं लग्न मोडण्यास स्वतःला जबाबदार धरले आहे. एका मुलाखतीत नीनाने सांगितले की, त्यांनी मसाबाला लग्नासाठी विचारले होते, पण मसाबाला लग्नापूर्वी लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहायचे होते ज्याला नीनाने नकार दिला होता.
Web Title: Neena gupta reveals reason behind daughter masaba gupta divorce jshd import