-
महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री नम्रता संभेराव सध्या ‘नाच गं घुमा’ चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे.
-
आज ( १३ मे २०२४ ) लग्नाच्या वाढदिवसानिमित्त नम्रताने आपल्या नवऱ्याबरोबरचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
नम्रताने वैयक्तिक आयुष्यात २०१३ मध्ये योगेश संभेराव यांच्याशी लग्न केलं.
-
नम्रता आणि योगेश एकत्र कॉलेजमध्ये होते. त्यानंतर सोशल मीडियामुळे त्यांची मैत्री अधिक घट्ट झाली. या मैत्रीचं रुपांतर पुढे प्रेमात झालं.
-
लग्नाच्या वाढदिवसानिमित्त फोटो शेअर करत नम्रता लिहिते “Happy anniversary माय लव्ह…आपण आयुष्यभर असेच एकत्र, हसत-खेळत आनंदी राहुयात.”
-
नम्रता आणि योगेश यांना रुद्राज नावाचा गोंडस मुलगा आहे.
-
आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर नम्रताला तिच्या नवऱ्याने खंबीरपणे साथ दिली आहे.
-
लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शेअर केलेल्या फोटोंमध्ये नम्रताने वेस्टर्न लूक केल्याचं पाहायला मिळत आहे.
-
दरम्यान, लग्नाच्या वाढदिवसानिमित्त नेटकऱ्यांसह मनोरंजन विश्वातील कलाकार नम्रतावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. ( सर्व फोटो सौजन्य : नम्रता संभेराव इन्स्टाग्राम )
‘नाच गं घुमा’ फेम नम्रता संभेरावच्या नवऱ्याला पाहिलंत का? लग्नाच्या वाढदिवशी शेअर केले खास फोटो
लग्नाच्या वाढदिवसानिमित्त अभिनेत्री नम्रता संभेरावची खास पोस्ट, पाहा फोटो
Web Title: Namrata sambherao wedding anniversary her husband yogesh shares special photos sva 00