-
OTT वरील प्रसिद्ध वेब सिरिज ‘पंचायत’च्या तिसऱ्या सीझनचे ट्रेलर प्रदर्शित झाले आहे.
-
या मालिकेत साधी रिंकीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सांविकाही चर्चेत आहे.
-
मालिकेत आत्तापर्यंत तुम्ही सांविकाचे अभिनय पाहिलेच असेल. पण, मालिकेत अतिशय साधी आणि शांत दिसणारी सांविका आपल्या खऱ्या आयुष्यात खूपच स्टायलिश आहे.
-
मालिकेत तुम्ही सांविकाला नेहमीच सलवार कमीजमध्ये पाहिलं असेल पण खऱ्या आयुष्यात सांविका खूप स्टायलिश आहे. ती अनेकदा तिचे सुंदर फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करत असते.
-
सांविकाचे इन्स्टाग्रामवर १.९५ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.
-
८ जानेवारी १९९० मध्ये मध्य प्रदेशात जबलपूरमध्ये जन्मलेल्या सांविकाने अनेक वेब सीरिजमध्ये काम केले आहे. ‘पंचायत’ व्यतिरिक्त तिने ‘हजमत’, ‘लखन लीला भार्गव’ यासारख्या वेब सीरिजमध्येही काम केले आहे.
-
सांविकाला ‘पंचायत -२’ मधील रिंकीच्या भूमिकेसाठी फिल्मफेअर OTT-२०२२ चे सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचे नामांकन मिळाले होते.
-
(All Photos credit: @iamsanvikaa/instagram)
Photos: ‘पंचायत’ मध्ये रिंकीची भूमिका साकारणारी सांविका खऱ्या आयुष्यात आहे अगदी स्टायलिश ; पाहा फोटो
पंचायत वेब सीरिजमध्ये आपल्या साधेपणाने आणि निरागसपणाने प्रेक्षकांची मने जिंकणारी सांविका खऱ्या आयुष्यात खूपच स्टायलिश आणि ग्लॅमरस आहे. सांविका सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि अनेकदा तिचे फोटो शेअर करत असते.
Web Title: Savika who plays rinki in panchayat is very stylish in real life see photos arg02