-
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ शो गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे.
-
आता एक बातमी समोर आली आहे की काही काळापूर्वी दिलीप जोशी यांनी रागाने निर्मात्यांना शो सोडण्याची धमकी दिली होती.
-
तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये दिसलेली जेनिफर मिस्त्रीने अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान खुलासा केला होता की दिलीप जोशी देखील काही वेळापूर्वी शो सोडणार होते.
-
शोचे ऑपरेशनल हेड सोहेल रमानी आणि दिलीप यांच्यात खूप भांडण झाले आणि वाद झाला. प्रकरण इतकं वाढलं की सोहेल रमानींनी दिलीप जोशी यांच्यावर खुर्ची फेकली. त्यानंतर सोहेल इथं काम करत असेल तर मी शो सोडणार, असं दिलीप म्हणाले होते. असा दावा मोनिका भदोरियाने केला होता.
-
शोची अभिनेत्री बावरी म्हणजेच मोनिका भदोरिया हिने दिलीप जोशींबरोबर सेटवर हे सगळं घडल्याचा दावा केला होता.
-
याआधी दिशा वाकानीपासून शैलेश लोढापर्यंत अनेक स्टार्सनी हा शो सोडला आहे. त्यातच आता दिलीप जोशी शो सोडतील असं म्हटलं जातंय, पण अद्याप त्यांनी किंवा निर्मात्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिलेली नाही.
‘तारक मेहता…’च्या निर्मात्याने भांडणानंतर दिलीप जोशींवर फेकली खुर्ची? ‘जेठालाल’ शो सोडणार का?
दिलीप जोशी या मालिकेत जेठालाल गडाची महत्त्वाची भूमिका साकारतात.
Web Title: Taarak mehta ka ooltah chashmah dilip joshi controversy with producer hrc