-
‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर १७ जूनपासून अभिनेत्री शिवानी सुर्वे व मानसी कुलकर्णी यांची प्रमुख भूमिका असलेली ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ नवी मालिका सुरू होणार आहे. सोमवार ते शुक्रवार रात्री ९ वाजता मालिका प्रसारित होणार आहे.
-
‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ नव्या मालिकेतून ‘स्टार प्रवाह’चा जुना व लोकप्रिय चेहरा प्रेक्षकांच्या पुन्हा भेटीस येत आहे.
-
‘स्टार प्रवाह’च्या ‘गोठ’ मालिकेतून घराघरात पोहोचलेला लोकप्रिय अभिनेता समीर परांजपे ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ मालिकेत झळकणार आहे.
-
‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ मालिकेत समीर तेजस प्रभू उर्फ तेजा ही व्यक्तिरेखा साकारणार आहे.
-
तेजस प्रभू हा स्वातंत्र्य सूर्य या वर्तमानपत्राचे संपादक भास्कर प्रभू यांचा नातू. स्वातंत्र्यसेनानींचा वारसा लाभलेल्या आपल्या घराण्याचा तेजसला प्रचंड अभिमान आहे.
-
प्रभूंचा पारंपरिक वाडा जपण्यासाठी तेजसची धडपड सुरु आहे. मात्र त्याच्या वहिनीला तेजसला हरवून प्रभू निवासाचा ताबा मिळवायचा आहे. प्रभू कुटुंबाची शान समजली जाणारी ही वास्तू तेजस वाचवू शकेल का? यात त्याला कुणाची साथ मिळणार? हे मालिकेतून उलगडेल.
-
‘स्टार प्रवाह’च्या या नव्या मालिकेत काम करण्यासाठी समीर प्रचंड उत्सुक आहे.
-
तेजस या व्यक्तिरेखविषयी सांगताना समीर म्हणाला, “तेजस ही व्यक्तिरेखा खूपच वेगळी आहे. तो खोडकर आहे. त्याला कुणी डिवचलं तर तो आपलं म्हणणं खरं करण्यासाठी वाटेल ते करू शकतो. मला मालिकेचं नाव आणि गोष्ट खूपच भावली.”
-
“कोणतंही नातं एकतर्फी असून चालत नाही. ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ करतच नातं टिकवावं लागतं. त्यामुळे प्रत्येक वयोगटाला आपलीशी वाटेल अशी गोष्ट आणि पात्र या मालिकेची जमेची बाजू म्हणता येईल. शिवानी सुर्वेसोबत मी पहिल्यांदा काम करतोय. काम करताना खूप मजा येतेय,” असं समीर म्हणाला. (सर्व फोटो सौजन्य – स्टार प्रवाह)
Photos: समीर परांजपेची ‘स्टार प्रवाह’वर पुन्हा दमदार एन्ट्री, ‘थोडं तुझं आणि थोड माझं’ नव्या मालिकेत शिवानी सुर्वेबरोबर झळकणार
‘थोडं तुझं आणि थोड माझं’ नव्या मालिकेत समीर परांजपे कोणत्या भूमिकेत झळकणार जाणून घ्या…
Web Title: Marathi actor sameer paranjape entry in thod tuz ani thod maz star pravah new serial pps