-
दो पैसे की धूप, चार आने की बारीश हा मनीषा कोईराला आणि रजत कपूर अभिनीत चित्रपट आहे. २००९ मधील हा चित्रपट एक वृद्ध वेश्या एका समलिंगी गीतकाराशी तिची मैत्री यावर बेतलेला आहे. (फोटो: X/@rosogollax)
-
‘मजा मा’ हा आनंद तिवारी दिग्दर्शित २०२२ चा चित्रपट आहे, ज्यात माधुरी दीक्षित आणि गजराज राव यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटात दोन समलैंगिक मैत्रिणींचं नातं दाखवण्यात आलं आहे. (फोटो: X/@isura)
-
जुही चावला आणि संजय सुरी यांचा ‘माय ब्रदर… निखिल’हा चित्रपट २००५ मध्ये रिलीज झाला. या चित्रपटाची खूप चर्चा चर्चा झाली होती. (फोटो: X/@kingosunens)
-
फराज आरिफ अन्सारी दिग्दर्शित शीर कोरमा चित्रपटात शबाना आझमी, दिव्या दत्ता आणि स्वरा भास्कर यांच्या भूमिका आहेत. (फोटो: X/@divyadutta25)
-
‘द शेमलेस’ हा २०२४चा कोन्स्टँटिन बोजानोव दिग्दर्शित चित्रपट आहे. यात दिल्लीतील वेश्यालयातून पळून जाणाऱ्या रेणुकाची कहाणी दाखवण्यात आली आहे. या चित्रपटासाठी अनसूया सेनगुप्ताला कान सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. (फोटो: IMDb)
-
फायर (१९९६) हा शबाना आझमी आणि नंदिता दास यांच्या मुख्य भूमिका असलेला चित्रपट आहे. दीपा मेहता दिग्दर्शित, ही कथा दु:खी वैवाहिक जीवनातील दोन स्त्रियांभोवती फिरते. समलिंगी संबंध दाखवणारा हा पहिला मुख्य प्रवाहातील भारतीय चित्रपट होता. (फोटो: X/@indianabhinetri)
-
मार्गारीटा विथ अ स्ट्रॉ हा २०१४ चा कल्की कोचलिन अभिनीत आणि शोनाली बोस दिग्दर्शित चित्रपट आहे. (फोटो: IMDb)
-
‘शुभ मंगल जादा सावधान’ हा आयुष्मान खुराना आणि जितेंद्र कुमार अभिनीत २०२० मधील रोमँटिक कॉमेडी आहे. हे अमन त्रिपाठी आणि कार्तिक सिंग यांच्यातील नातेसंबंधांवर आधारीत हा चित्रपट आहे. (फोटो: IMDb)
-
अनिल कपूर, सोनम कपूर आणि राजकुमार राव अभिनीत ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ २०१९ मध्ये प्रदर्शित झाला होता. (फोटो: X/@wlwfilmz)
-
‘बधाई दो’ हा २०२२ सालचा कॉमेडी-ड्रामा सिनेमा आहे. यात राजकुमार राव आणि भूमी पेडणेकर आहेत. एक पोलीस अधिकारी शार्दुल आणि शारीरिक शिक्षणाची शिक्षिका सुमन यांचं लग्न अन् गुंतागुंत यात दाखवण्यात आली आहे. (फोटो: IMDb)
-
अलिगढ हा अलिगढ मुस्लीम विद्यापीठातील प्राध्यापक रामचंद्र सिरास यांच्या जीवनावर आधारित बायोपिक आहे, या चित्रपटात मनोज बाजपेयी आणि राजकुमार राव यांच्या भूमिका आहेत. (फोटो: IMDb)
-
‘चंदीगड करे आशिकी’ हा २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला एक रोमँटिक ड्रामा आहे. आयुष्मान खुराना आणि वाणी कपूर यांच्या भूमिका असलेला हा चित्रपट अभिषेक कपूरने दिग्दर्शित केला आहे. (फोटो: X/@SurajBW)
-
देढ इश्किया हा २०१४ चा कॉमेडी-थ्रिलर चित्रपट आहे ज्यात अर्शद वारसी, नसीरुद्दीन शाह, माधुरी दीक्षित आणि हुमा कुरेशी यांच्या भूमिका आहेत. यात माधुरी दीक्षितने साकारलेली बेगम पारा आणि हुमा कुरेशीची भूमिका साकारलेली मुनिया यांच्यातील घनिष्ठ समलिंगी संबंध दाखवले आहेत. (फोटो: IMDb)
माधुरी दीक्षितचा ‘मजा मा’ ते ‘बधाई दो’, LGBTQIA+ समुदायावर आधारित ‘हे’ बॉलीवूड चित्रपट तुम्ही पाहिलेत का?
LGBTQIA+ समुदायावर आधारित अनेक चित्रपट बॉलीवूडमध्ये तयार झाले आहेत.
Web Title: Bollywood movies on lgbtqia maja ma badhai ho shubh mangal jyada savdhan list madhuri dixit hrc