• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood actor imran khan shares photo of the new house his building pps

सिनेसृष्टी सोडल्यावर घर बांधण्यात रमला अभिनेता, डोंगराळ भागात गावरान पद्धतीने बांधलं आलिशान घर, पाहा Photos

अभिनेत्याने निसर्गाचा अभ्यासकरून बांधलेलं घर एकदा पाहाच

June 5, 2024 15:02 IST
Follow Us
  • ‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पाऊल ठेवणारा आमिर खानचा भाचा इमरान खान गेली कित्येक वर्षे इंडस्ट्रीपासून दूर आहे. त्याने बॉलीवूड सिनेसृष्टी सोडल्याचं म्हटलं जात आहे. पण सध्या इमरान एका विशेष गोष्टीमुळे खूप चर्चेत आला आहे. ते म्हणजे त्याचं डोंगराळ भागातलं घर.
    1/12

    ‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पाऊल ठेवणारा आमिर खानचा भाचा इमरान खान गेली कित्येक वर्षे इंडस्ट्रीपासून दूर आहे. त्याने बॉलीवूड सिनेसृष्टी सोडल्याचं म्हटलं जात आहे. पण सध्या इमरान एका विशेष गोष्टीमुळे खूप चर्चेत आला आहे. ते म्हणजे त्याचं डोंगराळ भागातलं घर.

  • 2/12

    ‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटामुळे रातोरात स्टार झालेला इमरानने डोंगराळ भागात स्वतःचं घर बांधलं आहे; ज्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. तसंच इमरानचं हे घर पाहून चाहते कौतुक करत आहेत.

  • 3/12

    इमरानने निसर्गाच्या सानिध्यात बांधलेल्या सुंदर घराच्या फोटोंनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अभिनेत्याने स्वतः आजूबाजूच्या निसर्गाचा अभ्यास करून डोंगराळ भागात हे घर बांधलं आहे.

  • 4/12

    आपल्या सुंदर घराचे फोटो शेअर करत अभिनेत्याने लिहिलं आहे, “गेल्या काही वर्षांपासून मी जी काही काम केली, त्यापैकी एक म्हणजे घर बनवणं होतं. मी काही चित्रपटात आर्किटेक्चरची भूमिका केली होती. पण खऱ्या आयुष्यात कोणत्याही ट्रेनिंग शिवाय एक्सपर्ट होण्याचा दिखावा करू शकत नाही. पण मला गोष्टी स्वतः बनवण्यात आणि शिकण्यात खूप मजा येते.”

  • 5/12

    “मी हे ठिकाण यासाठी निवडलं कारण हे कमाल आहे. दोन नद्यांनी वेढलेलं आणि कड्याच्या खाली वसलेलं आहे…तसंच अगदी घराच्या समोर सूर्यास्त होतो,” असं इमराने सांगितलं.

  • 6/12

    पुढे अभिनेत्याने सांगितलं, “मला माहित होतं, लँडस्केपनुसार घराची रचना करणं चांगलं असतं. माझा हेतू एक आलिशान हॉलिडे व्हिला तयार करण्याचा नव्हता, तर लँडस्केपमधून प्रेरित होऊन करण्याचा हेतू होता. घर हे फक्त पाहण्यासाठी नाहीये, हा एक निवारा आहे. जिथून तुम्ही निसर्गाचं निरीक्षण करून कौतुक करू शकता.”

  • 7/12

    “मी पहिलं वर्ष सूर्योदय आणि सूर्यास्त, पाऊस पडल्यानंतर धबधब्यांचा प्रवाह आणि ऋतूमध्ये बदलणारी पाने पाहण्यासाठी वेगवेगळ्या वेळी या ठिकाणी भेट दिली. यामुळे मला एक आधार मिळाला, ज्यावरून मी माझ्या काम रिवाइज करण्याबरोबर स्केचवर देखील काम करू शकलो होतो,” असं अभिनेत्याने सांगितलं.

  • 8/12

    “माझ्या कॉन्ट्रॅक्टर आणि स्ट्रक्चरल इंजिनिअरशी सल्लामसलत केल्यानंतर मी काँक्रीट स्लॅब बांधण्याचा निर्णय रद्द केला. त्याऐवजी आजूबाजूच्या गावांमध्ये ज्याप्रमाणे घरं बांधण्यासाठी जी पद्धत वापरली आहे, त्या पारंपरिक पद्धतीचा अवलंब केला,” असं इमरान म्हणाला.

  • 9/12

    पाया बांधण्यासाठी दगड, एक मजली विटांच्या भिंती आणि छत्रासाठी पत्रे. बस एवढंच, अशा प्रकारे इमरानने डोंगराळ भागात घर बांधलं आहे.

  • 10/12

    पुढे इमरानने हे घर बांधण्यासाठी किती खर्च आला हे देखील स्पष्ट केलं. त्याने लिहिलं, “आधीच बांधून तयार झालेल्या व्हिलाच्या किंमतीपेक्षा मला खर्च कमी आला. मला आश्चर्य वाटते की मार्कअप कुठे जातो?”

  • 11/12

    अभिनेता इमरान खानने निसर्गाचा विचार करून दगड, विटांनी बांधलं स्वतःचं सुंदर घर नेटकऱ्यांचा खूपच आवडलं आहे.

  • 12/12

    सर्व फोटो सौजन्य- इमरान खान इन्स्टाग्राम

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Bollywood actor imran khan shares photo of the new house his building pps

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.