-
९०च्या दशकापासून आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांना भुरळ घालणारी अभिनेत्री म्हणजेच सोनाली बेंद्रे.
-
सोनालीचे लाखो चाहते असल्याने तिची एक झलक पाहण्यासाठी चाहते तिची आतुरतेने वाट पाहायचे.
-
सोनालीला भेटता यावं म्हणून लोकं खूप प्रयत्न करायचे.
-
सोनाली बेंद्रे एकदा भोपाळला गेली होती. तेव्हा तिच्या एका चाहत्याने तिला भेटण्याचा प्रयत्न केला. परंतु भेट झाली नाही. म्हणून त्याने नदीत उडी मारून आत्महत्या केली होती.
-
सोनालीला याबद्दल एका मुलाखतीत कळलं तेव्हा तिने मीडियाला विचारलं की, “हे खरं आहे का? कसं कोणी स्वत:चा जीव देऊ शकतं?”
-
सोनालीने एकदा असंही सांगितलं होतं की, ९०च्या काळात तिला चाहते पत्र पाठवायचे. तिचे चाहते रक्ताने ते पत्र लिहायचे. हे बघून सोनालीला खूप वाईट वाटायचं.
-
सोनाली म्हणाली होती की, “लोकं कशी काय दुसऱ्यांना इतक्या मोठ्या स्थानी ठेवतात आणि स्वत:च मोल विसरतात.”
-
सोनाली हेदेखील म्हणाली होती की, बॉलीवूड स्टार्ससाठी असलेलं लोकांचं हे वेडेपण तिला समजायचंच नाही.
-
सोनालीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री शेवटची ‘द ब्रोकन न्यूज’ या वेब सीरिजध्ये झळकली होती.
एका चाहत्याने दिला जीव तर…, ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक किस्सा, म्हणाली, “रक्ताने पत्र…”
ही अभिनेत्री ९०च्या काळापासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतेय.
Web Title: Sonali bendre fan committed suicide and one wrote a letter with blood dvr