• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. luxurious house of anil ambani net worth tina ambani property private jet car collection details hrc

५००० कोटींचे आलिशान घर, प्रायव्हेट जेट, तरीही डोक्यावर कर्ज अन्…; अनिल अंबानींपेक्षा श्रीमंत आहेत पत्नी टीना मुनीम

Anil Ambani Net Worth: मुकेश अंबानी यांचे धाकटा भाऊ अनिल अंबानी यांच्यावर खूप कर्ज आहे. बिझनेसमध्ये प्रचंड नुकसान होऊन दिवाळखोरी अनिल अंबानी कोट्यवधी रुपयांचे मालक आहेत.

July 11, 2024 11:02 IST
Follow Us
  • Anil Ambani mukesh Ambani
    1/15

    अनिल अंबानी हे एकेकाळी जगातील सहाव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती होते. अनिल अंबानी हे मुकेश अंबानी यांचे धाकटे भाऊ आहेत. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत आणि आयुष्यात अनेक चढउतारांचा सामना केला आहे. (फोटो – इंडियन एक्सप्रेस)

  • 2/15


    २०२० मध्ये अनिल अंबानी यांना दिवाळखोर घोषित करण्यात आलं. तरीही अनिल आणि त्यांची पत्नी आणि बॉलीवूड अभिनेत्री टीना अंबानी ऐशोआरामात जीवन जगत आहेत. (फोटो – इंडियन एक्सप्रेस)

  • 3/15

    आज आपण अनिल अंबानी आणि टीना अंबानी यांची जीवनशैली, कोट्यवधींचा बंगला, खासगी जेट, कार कलेक्शन आणि नेट वर्थ याबद्दल जाणून घेणा आहोत. (फोटो – टीना अंबानी इन्स्टाग्राम)

  • 4/15

    अनिल अंबानी हे रिलायन्स इंडस्ट्रीजचे संस्थापक धीरूभाई अंबानी यांचे धाकटे पुत्र आहेत. धीरूभाई अंबानी यांना २ मुलं आणि दोन मुली अशी चार अपत्ये आहेत. मुकेश अंबानी, अनिल अंबानी, नीना कोठारी आणि दीप्ती साळगावकर ही त्यांची नावं आहेत. (फोटो – टीना अंबानी इन्स्टाग्राम)

  • 5/15

    अनिल अंबानी हे उद्योगपती आहेत. अनिल अंबानी यांनी बॉलिवूड अभिनेत्री टीना मुनीमशी लग्न केले आहे. त्यांना दोन मुले आहेत – जय अनमोल अंबानी आणि जय अंशुल अंबानी. ज्यामध्ये मोठा मुलगा जय अनमोलचे लग्न क्रिशा शाहशी झाले आहे. (फोटो – टीना अंबानी इन्स्टाग्राम)

  • 6/15

    अनिल अंबानी यांच्याकडे ५००० कोटींचे १७ मजली आलिशान घर –
    मुंबईतील सर्वात पॉश परिसर मानल्या जाणाऱ्या पाली हिल परिसरात अनिल अंबानी यांचे १७ मजली घर आहे. हे घर १६ हजार स्केवर फूट जागेत पसरलेले आहे. (फोटो – टीना अंबानी इन्स्टाग्राम)

  • 7/15

    २००० च्या सुमारास ही महागडी आणि आलिशान मालमत्ता रिलायन्सने खरेदी केली होती. इमारतीच्या छतावर हेलिपॅड आहे, ज्यावर अनेक हेलिकॉप्टर एकाच वेळी उतरू शकतात. ६६ मीटर उंचीच्या या घरामध्ये एक ओपन स्विमिंग पूल, एक मोठी टेरेस्ड गार्डन, एकाधिक जिम आणि एक गॅरेज आहे. (फोटो – टीना अंबानी इन्स्टाग्राम)

  • 8/15

    अनिल अंबानी यांच्या घरातील प्रत्येक सदस्यासाठी एक मजला आहे. घराचे इंटीरियर इंटरनॅशनल आर्किटेक्ट्सने डिझाईन केले आहे. तसेच, या आलिशान घरात आरामदायी रेक्लिनर्स, महागडे सोफा सेट आणि इम्पीरियल काचेच्या खिडक्या आहेत. या घरात अनिल आणि टीना अंबानी त्यांची दोन मुलं आणि सून राहतात. (फोटो – टीना अंबानी इ्स्टाग्राम)

  • 9/15

    अनिल अंबानींच्या कुटुंबाकडे स्वतःचे खासगी जेट देखील आहे. अल्ट्रा-लाँग जेट बॉम्बार्डियर ग्लोबल एक्सप्रेस XRS ची किंमत ३११ कोटी रुपये आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, या आलिशान खासगी जेटमध्ये तीन केबिन झोन आहेत.(फोटो – टीना अंबानी इन्स्टाग्राम)

  • 10/15

    अंबानी कुटुंबाच्या गॅरेजमध्ये अनेक महागड्या आणि आलिशान गाड्या आहेत. ज्यामध्ये
    Rolls Royce Phantom : ३.५ कोटी रुपये
    ऑडी Q7: ८८- ९७ लाख
    मर्सिडीज GLK350: ७७ लाख रुपये
    याशिवाय अंबानी कुटुंबाकडे एक महागडी Lexus XUV कार देखील आहे.

  • 11/15

    अनिल अंबानी नेट वर्थ :
    टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, अनिल अंबानी यांच्याकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती असूनही प्रचंड तोट्यामुळे ते दिवाळखोर झाले. (फोटो – टीना अंबानी इन्स्टाग्राम)

  • 12/15

    अनिल अंबानी यांची एकूण संपत्ती २.९९ कोटी डॉलर्स म्हणजेच अंदाजे २४९ कोटी रुपये आहे. GQ नुसार, त्यांच्या कंपनीचे बाजार मूल्य सुमारे १०, ७५९ कोटी रुपये आहे. (फोटो – इंडियन एक्सप्रेस)

  • 13/15

    टीना अंबानी नेट वर्थ
    न्यूज 18 च्या रिपोर्टनुसार, टीना अंबानी यांची एकूण संपत्ती २३३१ कोटी रुपये आहे. अशा प्रकारे टीना आणि अनिल अंबानी यांची एकूण संपत्ती २५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. (फोटो – टीना अंबानी इन्स्टाग्राम)

  • 14/15

    व्यवसायात नुकसान आणि अनेक आव्हानं असूनही, अनिल आणि टीना अंबानी ऐशोआरामात जीवन जगतात. (फोटो – इंडियन एक्सप्रेस)

  • 15/15

    त्यांची श्रीमंती जीवनशैली, आलिशान घरे आणि महागड्या गाड्यांमधून दिसून येते.(फोटो – इंडियन एक्सप्रेस)

TOPICS
अनिल अंबानीAnil Ambaniफोटो गॅलरीPhoto GalleryबिझनेसBusiness

Web Title: Luxurious house of anil ambani net worth tina ambani property private jet car collection details hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.