scorecardresearch

अनिल अंबानी

अनिल अंबानी (Anil Ambani) हे एक भारतीय व्यावसायिक आहेत. अनिल हे धीरूभाई अंबानी यांचा धाकटा मुलगा आणि मुकेश अंबानी यांचा धाकटा भाऊ आहे. अनिल अंबानी यांचा जन्म ४ जून १९५९ रोजी झाला. हे भारतीय उद्योगपती रिलायन्स ग्रुपचे (ऊर्फ रिलायन्स एडीए ग्रुप) चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या विलगीकरणानंतर जुलै २००६ मध्ये रिलायन्स समूहाची निर्मिती करण्यात आली. रिलायन्स कॅपिटल आणि रिलायन्स पॉवरसह अनेक स्टॉक्स लिस्टेड कॉर्पोरेशन्सचे मालकही आहेत. अनिल अंबानी हे एकेकाळी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक होते, पण आता ते श्रीमंतांच्या यादीपासून कोसो दूर गेले आहेत. रिपोर्ट्सनुसार, २००७ मध्ये अनिल अंबानी यांच्याकडे ४५ बिलियन डॉलर्सची संपत्ती होती. एवढेच नाही तर २००८ मध्ये जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ते सहाव्या स्थानावर होते. २००२ मध्ये धीरूभाई अंबानी यांच्या निधनानंतर रिलायन्स इंडस्ट्रीजचा व्यवसाय मुकेश आणि अनिल अंबानी यांच्यात विभागला गेला होता. मुकेश अंबानी यांना पेट्रोकेमिकल, टेक्सटाईल आणि रिफायनरी; तर अनिल यांना टेलिकॉम, फायनान्स आणि एनर्जीचा व्यवसाय मिळाला. वाटणीच्या वेळी अनिल अंबानींची स्थिती मजबूत मानली जात होती, कारण त्यांच्याकडे नव्या काळातील व्यवसाय होता. मात्र, असे असूनही ते यात विशेष काही करू शकले नाहीत आणि आज त्यांच्या कंपन्यांना दिवाळखोरीचा सामना करावा लागत आहे.


अनिल अंबानी यांच्या रिलायन्स इनोव्हेंचर्स कंपनीला NCLT मध्ये आणून दिवाळखोरीची कारवाई करण्यात आली आहे. अमेरिकन फायनान्सर जेसी फ्लॉवर यांनी अनिल अंबानी यांच्या कंपनीला कर्जाची परतफेड न केल्यामुळे एनसीएलटीमध्ये ओढले आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात अमेरिकास्थित फायनान्सरकडे येस बँकेने ४८,००० कोटी रुपयांचे बुडीत कर्ज हस्तांतरित केले होते, ज्यामध्ये अनिल अंबानींच्या कर्जाचाही समावेश होता.


अनिल अंबानींच्या रिलायन्स कॅपिटलची उपकंपनी असलेल्या रिलायन्स जनरल इन्शुरन्सला जीएसटी इंटेलिजन्स डायरेक्टरेट जनरल (DGGI) ने ९२२.५८ कोटी रुपयांच्या कारणे दाखवा नोटिसा पाठवल्या आहेत. डीजीजीआयने कंपनीला नोटीस पाठवून कोट्यवधींच्या उत्पन्नावर जीएसटीची मागणी केली आहे. अनिल अंबानी संदर्भात सर्व बातम्या तुम्ही या सदरामध्ये वाचू शकता.


Read More
anil ambani canara bank fraud account case  on reliance communications withdrawn
अनिल अंबानी यांना दिलासा; कर्ज खाते फसवे म्हणून वर्गीकृत करण्याचा निर्णय मागे

प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी यांच्या कंपनीचे कर्ज खाते फसवे म्हणून वर्गीकृत करण्याचा निर्णय मागे घेण्यात येत असल्याची माहिती कॅनरा बँकेने…

Anil Ambani power generation project acquired by Adani Power Limited print eco news
अनिल अंबानींचा वीजनिर्मिती प्रकल्प अदानींकडे! चार हजार कोटींच्या मोबदल्यात अधिग्रहण

नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी येथील दिवाळखोरीत निघालेला अनिल अंबानी यांचा विदर्भ इंडस्ट्रीज पॉवर लिमिटेड (व्हीआयपीएल) हा वीजनिर्मिती प्रकल्प सुमारे चार हजार…

Starting Jio was the biggest risk of my life says Ambani
‘जिओ’ची सुरुवात हे आयुष्यातील सर्वात मोठे धाडस – अंबानी

आम्ही नेहमीच मोठे धोके स्वीकारले आहेत. जिओ ही आतापर्यंत घेतलेली सर्वात मोठी जोखीम होती. मी स्वत: बहुसंख्य भागधारक होतो, असे…

anil ambani canara bank fraud account case  on reliance communications withdrawn
अनिल अंबानींना २५,००० रुपयांचा दंड; तातडीची गरज नसतानाही जलद सुनावणीची मागणी

अंबानी यांना प्राप्तिकर विभागाने केवळ कारणे दाखवा नोटीस बजावली होती. असे असतानाही त्यांनी त्याला आव्हान देताना याचिकेवर तातडीच्या सुनावणीची गरज…

Rekiance Share
Reliance च्या शेअरमध्ये आणखी ३० टक्के वाढीची क्षमता, आंतरराष्ट्रीय ब्रोकरेज फर्मचा दावा

Reliance Target Price: २० फेब्रुवारी रोजी निफ्टी ५० निर्देशांकातील बलाढ्य कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या शेअरमध्ये जवळपास १ टक्के वाढ झाली.…

Court relief to Anil Ambani case in Canara Bank fraud case
अनिल अंबानींना न्यायालयाचा दिलासा; कॅनरा बँकेच्या आदेशाला स्थगिती, कारवाईबाबत आरबीआयला विचारणा

अंबानी यांनी कंपनीचे कर्ज खाते फसवे असल्याचे जाहीर करण्याच्या कॅनरा बँकेच्या मार्च २०२४च्या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे

Delhi High Court stays Anil Ambani Reliance Power
अनिल अंबानींच्या रिलायन्स पॉवरला दिलासा

अनिल अंबानी समूहातील कंपनी असलेल्या रिलायन्स पॉवर लिमिटेडला सौर वीजपुरवठ्याच्या लिलावात सहभागावर बंदीच्या सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या (एसईसीआय) निर्णयाला…

Anil Ambani Company Banned
Anil Ambani: अनिल अंबानींना मोठा धक्का; रिलायन्सच्या कंपनीवर तीन वर्षांसाठी बंदी, शेअर गडगडले

Anil Ambani Company Banned: सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने अनिल अंबानींना मोठा धक्का दिला आहे. रिलायन्स पॉवर आणि इतर कंपन्यांवर…

Anmol Ambani fined 1 crore by SEBI print eco news
अनमोल अंबानी यांना सेबीचा एक कोटी दंड

उद्योगपती अनिल अंबानी यांचे पुत्र अनमोल यांना भांडवली बाजार नियंत्रक सेबीने एक कोटी रुपयांचा दंड केला आहे. रिलायन्स होम फायनान्सशी…

reliance Infra electric cars news
अनिल अंबानींची रिलायन्स ई-वाहनांच्या निर्मितीत उतरणार? २.५ लाख गाड्यांचं प्राथमिक लक्ष्य

अनिल अंबानींच्या रिलायन्स समूहाचा भाग असलेल्या कंपनीने ईव्ही प्लांट निर्मितीसाठी लागणाऱ्या खर्चाची तसेच एकूण व्यवहार्यता तपासण्यासाठी सल्लागारांची नियुक्ती आहे.

संबंधित बातम्या