-
संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित ‘ॲनिमल’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली.
-
हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. या चित्रपटात रणबीर कपूर, बॉबी देओल, अनिल कपूर आणि रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत दिसले होते.
-
या चित्रपटात अभिनेता सिद्धांत कर्णिकने रणबीर कपूरच्या भावोजींची भूमिका साकारली होती. या चित्रपटात त्याची नकारात्मक भूमिका होती, मात्र त्याचा अभिनय लोकांना खूप आवडला होता.
-
याआधी हा अभिनेता ‘आदिपुरुष’, ‘थप्पड’ आणि ‘लफंगे परिंदे’ सारख्या चित्रपटांमध्ये दिसला आहे.
-
सिद्धांतने २००५ मध्ये आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. अलीकडेच अभिनेत्याने खुलासा केला आहे की, त्याला त्याच्या करिअरच्या सुरुवातीला कास्टिंग काउचचा सामना करावा लागला होता.
-
सिद्धांत एका मुलाखतीत म्हणाला, “मी २००५ मध्ये वयाच्या २२ व्या वर्षी इंडस्ट्रीत काम करायला सुरुवात केली होती. मी एका कोऑर्डिनेटर भेटलो ज्याने मला माझा पोर्टफोलिओ विचारला. त्यानंतर कोऑर्डिनेटरने मला रात्री १०.३० वाजता त्याच्या घरी बोलावलं. मला विचित्र वाटलं, पण मी जायचा निर्णय घेतला.”
-
सिद्धांत पुढे म्हणाला, “मी याबद्दल फारसा विचार केला नाही. मी त्याच्या घरी गेलो. मी त्यावेळी खूप लहान होतो आणि मी त्याच्या घरात फॅमिली फोटो पाहिले, त्यामुळे मला मी सुरक्षित आहे असं वाटलं.”
-
अभिनेता पुढे म्हणाला, “कोऑर्डिनेटरने मला म्हटलं की कॉम्प्रोमाईज केल्याशिवाय मला काम मिळणार नाही. केल्याशिवाय काम करणार नाही. मग तो माझ्या जवळ आला अन् तेव्हाच मी त्याला म्हटलं की मला अशा प्रकारच्या कामात रस नाही.”
-
सिद्धांतचं बोलणं ऐकून कोऑर्डिनेटर संतापला आणि तुला इंडस्ट्रीत काम मिळू देणार नाही असा दावा केला होता.
-
सिद्धांतने आजवर अनेक चित्रपट व मालिकांमध्ये काम केलं आहे.
-
सिद्धांतने ‘रिमिक्स’, ‘झूम जिया रे’, ‘माही वे’, ‘किस्मत’, ‘आसमान से आगे’, ‘ये है आशिकी’, ‘गुस्ताख दिल’, ‘सावधान इंडिया’ आणि ‘मेरे साई’सह अनेक टीव्ही शोमध्ये काम केले आहे.
-
(सर्व फोटो – सिद्धांत कर्णिक इन्स्टाग्राम)
“त्याने रात्री १०.३० वाजता घरी बोलावलं, मग माझ्या जवळ आला अन्…”, बॉलीवूड अभिनेत्याने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव
रणबीर कपूरच्या ‘अॅनिमल’ चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याने धक्कादायक प्रसंग सांगितला आहे.
Web Title: Animal actor siddhant karnick shared casting couch experience hrc